Don't Miss : ‘बाहुबली-२’ची पाच गाणी रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2017 1:16 PM
या वर्षाचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘बाहुबली-२’च्याबाबत दरदिवसाला काही ना काही अपडेट्स पुढे येत आहेत. काही दिवसांपूर्वीच ट्रेलर रिलीज केल्यानंतर चित्रपटाशी संबंधित इतरही काही गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहचविल्या जात असल्याने चित्रपटाबाबत प्रचंड आतुरता निर्माण झाली आहे.
या वर्षाचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘बाहुबली-२’च्याबाबत दरदिवसाला काही ना काही अपडेट्स पुढे येत आहेत. काही दिवसांपूर्वीच ट्रेलर रिलीज केल्यानंतर चित्रपटाशी संबंधित इतरही काही गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहचविल्या जात असल्याने चित्रपटाबाबत प्रचंड आतुरता निर्माण झाली आहे. आता या चित्रपटाची पाच गाणी यू-ट्युबवर रिलीज केल्याने गाणे ऐकल्यानंतर प्रेक्षकांना मंत्रमुग्ध झाल्याचा आनंद मिळत आहे. ‘ओका प्रणाम, साहोर बाहुबली, हमसा नावा, कन्ना निदुरिनचरा आणि डंडालय्या’ अशी ही पाच गाणी आहेत. सर्व गाणी तामिळ भाषेत असून, केवळ स्वरप्रणालीवर आधारित आहेत. यामध्ये सुरुवातीचे काही सेकंद दृश्य दाखविल्यानंतर पुढे गीताच्या बोलाचे इंग्रजीमध्ये अक्षरे दिसत आहेत. अशातही ही पाचही गाणी सध्या मोठ्या प्रमाणात यू-ट्युबवर ऐकले जात आहेत. गेल्या १६ मार्च रोजी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. पाच भाषांमध्ये रिलीज करण्यात आलेला हा ट्रेलर दहा कोटींपेक्षा अधिक वेळा बघण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत सर्वाधिक वेळा बघण्यात आलेल्या ट्रेलरचा रेकॉर्ड ‘बाहुबली-२’च्या नावावर नोंदविला गेला आहे. दोन वर्षांपूर्वी आलेल्या ‘बाहुबली’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात बरेचसे प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे या प्रश्नांची उकल करण्यासाठी प्रत्येकजण ‘बाहुबली-२’ची प्रतीक्षा करीत आहे. यात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ‘कटप्पाने बाहुबलीला का मारले?’ हा होय. सूत्रानुसार चित्रपटाचा क्लायमॅक्स लीक होऊ नये म्हणून दिग्दर्शक एस. राजामौली यांनी ‘बाहुबली : द कनक्लूजन’चे एक, दोन, तीन नव्हे तर चार क्लायमॅक्स शूट केले आहेत. त्यातील नेमका कोणता क्लायमॅक्स दाखविला जाईल हे अद्यापपर्यंत स्पष्ट केले गेले नाही. त्यामुळे चित्रपट वेळेच्या आधीच लीक केला गेला तरी, प्रेक्षकांना त्यांना अपेक्षित असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकणार नाहीत. ‘बाहुबली- २’ हा चित्रपट २८ एप्रिल रोजी रिलीज केला जाणार आहे. विविध ६ भाषांमध्ये रिलीज केला जाणार असल्याने याला प्रेक्षक तुफान प्रतिसाद देतील यात शंका नाही. याच चित्रपटाच्या पहिल्या भागालादेखील प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. त्यामुळे ‘बाहुबली-२’ हा बॉक्स आॅफिसवरील सर्वाधिक हिट चित्रपट ठरेल यात शंका नाही.