DON'T MISS : रणवीर सिंहने शेअर केला २७ वर्षे जुना एक खास व्हिडिओ...तुम्हीही पाहा...!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2017 12:14 PM
‘तम्मा तम्मा’ या गाण्याच्या रिमेक व्हर्जनची सध्या धूम सुरु आहे. १९९० मध्ये आलेल्या ‘थानेदार’ या चित्रपटातील हे ओरिजनल गाणे बप्पी लहरी आणि अनुराधा पौडवाल यांनी गायले होते. या गाण्याचा मेकिंग २७ वर्षे जुना मेकिंग व्हिडिओ पाहायला मिळाला तर? निश्चितपणे हा अनुभव शानदार असेल. कदाचित याच विचाराने अभिनेता रणवीर सिंह याने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
वरूण धवन आणि आलिया भट्ट यांचा ‘बद्रिनाथ की दुल्हनियां’ हा चित्रपट लवकर रिलीज होतोय. या चित्रपटातील ‘तम्मा तम्मा’ या गाण्याच्या रिमेक व्हर्जनची सध्या धूम सुरु आहे. १९९० मध्ये आलेल्या ‘थानेदार’ या चित्रपटातील हे ओरिजनल गाणे बप्पी लहरी आणि अनुराधा पौडवाल यांनी गायले होते. या गाण्याचा मेकिंग २७ वर्षे जुना मेकिंग व्हिडिओ पाहायला मिळाला तर? निश्चितपणे हा अनुभव शानदार असेल. कदाचित याच विचाराने अभिनेता रणवीर सिंह याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या गाण्यात बप्पी लहरी, अनुराधा पौडवाल यांच्यासोबत कोरस आणि संपूर्ण आॅकेस्ट्रा दिसतो आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या काही जुन्या आठवणी ताज्या झाल्याशिवाय राहणार नाही. सध्या गाण्यांच्या रेकॉर्डिंगसाठी अत्याधुनिक तंत्र वापरले जाते. पण त्याकाळात आॅकेस्ट्रासोबत गाणे रेकॉर्ड करणे म्हणजे, अतिशय कठीण काम होते. या व्हिडिओतून त्याकाळातील बॉलिवूडच्या कष्टांची कल्पना केली जाऊ शकते.ओरिजनल ‘तम्मा तम्मा’ गाणे माधुरी दीक्षित आणि संजय दत्त या जोडीवर चित्रीत करण्यात आले होते. सरोज खान यांनी ते कोरिओग्राफ केले होते. ‘बद्रिनाथ की दुल्हनियां’मध्ये ‘तम्मा तम्मा’ हे गाणे नव्याने रिक्रिएट करण्यात आले आहे. या गाण्याला रॅपर बादशाहने आवाज दिला असून तनिष्क बागचीने हे गाण्यासाठी रिमिक्स केले आहे, विशेष म्हणजे मूळ गाण्याला कायम ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नव्या रिमिक्स वर्जन मध्ये आलिया भट्ट व वरुणच्या नृत्य शैलीमध्ये मात्र काही धम्माल स्टेप्स पाहायला मिळत आहे. हे गाणे सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. आता या मूळ गाण्याचा मेकिंग व्हिडिओही पाहा...!