Join us

'चक दे इंडिया' सिनेमातील या दोन अभिनेत्री आता करतात हे काम?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2017 10:57 AM

किंग खान शाहरुखने काही वर्षांपूर्वी रुपेरी पडद्यावर चक दे इंडिया या सिनेमात हॉकी कोचची भूमिका साकारली होती. भारतीय महिला ...

किंग खान शाहरुखने काही वर्षांपूर्वी रुपेरी पडद्यावर चक दे इंडिया या सिनेमात हॉकी कोचची भूमिका साकारली होती. भारतीय महिला हॉकी संघाला जेतेपद मिळवून देत जुना डाग पुसून टाकायचा असा निर्धार केलेला कबीर खान शाहरुखने मोठ्या खुबीने साकारला होता. त्याने साकारलेला कबीर खान रसिकांच्या काळजात घर करुन गेला. दशकभरापूर्वी 10 ऑगस्ट 2007 रोजी रुपेरी पडद्यावर झळकलेल्या चक दे इंडिया या सिनेमात शाहरुखसह 16 तरुणींना कास्ट करण्यात आलं होतं. या सिनेमात या सोळा जणींनी साकारलेली हॉकीपटूची भूमिका रसिकांना चांगलीच भावली. यातील प्रत्येक तरुणीची सिनेमात काही ना काही खास भूमिका होती. प्रत्येकीने आपापल्या वाट्याला आलेल्या भूमिकेला योग्य न्याय दिला. त्यामुळेच हा सिनेमा त्यावेळी सुपरडुपर हिट ठरला होता.या सिनेमात आलिया बोस या हॉकी प्लेअरचं नाव कोच कबीर खानच्या तोंडून अनेकदा ऐकायला मिळतं. आपला अभिनय आणि हॉकी कौशल्याने आलिया बोसने रसिकांची मने जिंकली होती. आलिया बोस ही भूमिका अभिनेत्री अनैथा नायर हिने साकारली होती. सिने अभिनेत्री, थिएटर आर्टिस्ट आणि गायिका अशी तिची ओळख. 'बाय द पीपल' या मल्याळम सिनेमात अनैथाने गेस्ट अपिअरन्स दिला होता. त्यानंतर चक दे इंडिया सिनेमाची लॉटरी अनैथाला लागली होती. मात्र सिनेमानंतर सध्या अनैथा काय करते याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल. मुंबई कॉलिंग, वेल डन अब्बा, दम मारो दम, झूठा ही सही, एकांत, फोर्स अशा सिनेमांमध्येही अनैथाने काम केले आहे. गेल्या सहा वर्षांपासून अनैथा हॉगकाँगमध्ये फुलटाईम हेअर ड्रेसर म्हणून काम करत आहे. इतकंच नाही तर तिला एक साडेतीन वर्षांची मुलगीही आहे. मात्र तिच्याकडे पाहून तुम्हाला जराही वाटणार नाही की अनैथा ही एका मुलीची आई आहे. आलिया बोस या हॉकी प्लेअरसह चक दे इंडिया सिनेमात नेत्रा रेड्डी नावाचीही एक हॉकी प्लेअर होती. अभिनेत्री सांदिया फुर्ताडो हिने रुपेरी पडद्यावर नेत्रा रेड्डी साकारली होती. चक दे इंडियामधील आपल्या अदा, स्टाईल आणि अभिनयाने सांदियाने रसिकांची मने जिंकली होती. तिला प्रत्यक्ष जीवनात जग फिरायला आणि भटकंती करायला आवडते. नुकतंच तिने बुडापेस्टची सैर केली होती. चक दे इंडिया सिनेमानंतर सांदिया क्रीडा पीआरओ म्हणून काम पाहत आहे. चक दे इंडिया सिनेमानंतर कोणताही सिनेमा करण्याची इच्छा नव्हती असं सांदियाने सांगितले होते. Also Reda:सागरीका घाटगेचा मराठमोळा 'डाव'