बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असलेला अभिनेता शाहरुख खान हा हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. जगभरात शाहरुख खानची चांगलीच क्रेज आहे. शाहरुख खानने प्रचंड संपत्ती आणि अमाप प्रेम जमवले आहे. पण, खूपच कमी वयात शाहरुख आपल्या पालकांना गमावलं होतं. जेव्हा शाहरुख फक्त 16 वर्षांचा होता, तेव्हा वडील मीर ताज मोहम्मद खान यांचं कर्करोगाने निधन झालं. तर 1991 मध्ये त्यांची आई लतीफ फातिमा खान यांना शाहरुखनं गमावलं.
शाहरुखचं त्याची आई लतीफ फातिमा खान खूप खास नातं होतं. दोघांचं नातं इतकं घट्ट होतं की जेव्हा शाहरुखच्या आईचं निधन झालं, त्यानंतर त्याने प्रार्थना करणे बंद केलं होतं. शाहरुखच्या आईचे नाव मुंबईच्या प्रसिद्ध नानावटी हॉस्पिटलमधील एका वार्डला देण्यात आलं आहे. हे फार कमी लोकांना माहीत आहे. शाहरुख खानने एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा तो एका सहकाऱ्याच्या मुलाला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचला. तेव्हा त्याने पैशांअभावी तेथील गरीब परिस्थिती पाहिली. हे समजल्यानंतर, त्याने काही रक्कम दान केली. हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी वॉर्डला त्याच्या आईचे नाव देऊन त्यांचा सन्मान केला होता.
शाहरुख सध्या त्याच्या वडिलांच्या नावावर असलेल्या मीर फाऊंडेशनची देखरेख करतो, जे महिलांना सक्षम बनवण्यासाठी आणि ॲसिड हल्ल्यातील पीडितांना मदत करण्यासाठी काम करतं. फाउंडेशन त्यांच्या पुनर्प्राप्तीसाठी आणि सक्षमीकरणासाठी वैद्यकीय सहाय्य, निवास आणि प्रशिक्षण यासारख्या सुविधा प्रदान करते.
शाहरुखचा समावेश आज जगातील श्रीमंत अभिनेत्यांमध्ये केला जातो. शाहरुखची एकूण संपत्ती कोटींच्या आसपास आहे. पण त्याची पहिली कमाई ही फक्त 50 रुपये होती. करीयरच्या सुरुवातीला हा अभिनेता तिकीट विक्रीचा काम करायचा. या कामाचा मोबदला त्याला फक्त 50 रुपये मिळत असे, पुढे मेहनतीच्या जोरावर त्याने स्वत:ला सिद्ध केले.अनेक सुपरहिट सिनेमे देऊन सिने जगतात त्याने स्वत:चा अमिट ठसा उमटवला आहे.