Join us

'बेल बॉटम'च्या ट्रेलरमध्ये पहायला मिळालेल्या या अभिनेत्रीला ओळखलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 20:36 IST

बेल बॉटमचा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर सुपरहिट ठरला आहे

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा आगामी बहुचर्चित चित्रपट बेल बॉटमच्या ट्रेलरची चाहते उत्सुकतेने वाट पाहत होते. आधी जुलैमध्ये रिलीज होणार होता. मात्र चित्रपटगृहे बंद असल्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. दरम्यान आता अक्षय कुमारनेबेल बॉटमची नवीन रिलीज डेट जाहीर केली आहे आणि चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. अक्षय कुमारने चित्रपटाच्या टीमसोबत दिल्लीत ट्रेलर लाँच केला आहे.

बेल बॉटमच्या ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर सुपरहिट ठरला आहे. ट्रेलरमध्ये अक्षय कुमारच्या भूमिकेचे कौतुक होताना दिसत आहे. मात्र सर्वात जास्त चर्चा अभिनेत्री लारा दत्ताची होत आहे. त्याला कारणही तसेच आहे. खरेतर पहिल्यांदा ट्रेलर पाहिल्यानंतर तुम्ही लारा दत्ताला ओळखणं कठीण जात आहे. या चित्रपटात लारा दत्ताने इंदिरा गांधींची भूमिका साकारली आहे. लारा दत्ताच्या या लूकची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते आहे.

बेल बॉटम हा चित्रपट हेरगिरीवर आधारीत आहे. ही कथा ८०च्या दशकातील आहे. या चित्रपटात अक्षय कुमारने सीक्रेट एजेंटची भूमिका बजावली आहे. यात अभिनेता चेस प्लेअर आहे जो गाणे शिकवतो. त्याला हिंदी आणि इंग्रजी भाषेसोबत जर्मन भाषादेखील येते. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि लारा दत्ताशिवाय वाणी कपूर, हुमा कुरेशी मुख्य भूमिकेत आहे.

बेलबॉटम चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट १९ ऑगस्टला रिलीज होणार आहे.

या चित्रपटाचे शूटिंग लॉकडाउनमध्ये पार पडले आहे आणि जवळपास एक ते दीड महिन्यात शूटिंग पूर्ण करण्यात आले होते.

टॅग्स :लारा दत्ताबेल बॉटमअक्षय कुमारहुमा कुरेशीवाणी कपूर