श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) ही एक बॉलिवूडची आघाडीची अन् प्रसिद्ध पार्श्वगायिका आहे. सुमधुर गळा लाभलेली श्रेया 'मेलोडी क्वीन' म्हणून देखील प्रसिद्ध आहे. आपल्या सुमधूर गायिकिने चाहत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या श्रेयाची जगभर ख्याती आहे. तिच्या सुरेल गायकिने श्रेयाने असंख्य चाहत्यांच्या मनं जिंकली आहेत. आपल्या गायकीद्वारे श्रेया आजही चिकार पैसे कमावते. अनेकांना असा प्रश्न पडत असेल की, एका गाण्यासाठी 'मेलोडी क्वीन' किती मानधन घेते. तर जाणून घेऊयात श्रेयाच्या एकूण संपत्तीबाबत...
बॉलिवूड सिनेमामधील गाण्यांना जादुई आवाज देण्यासाठी श्रेया घोषाल हिला पहिली पसंती असते. केवळ हिंदीच नाही तर श्रेया बंगाली, तेलगू, मराठी यासह इतर प्रादेशिक भाषांमध्येही गाणी गाते. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे 1984 साली जन्मलेली श्रेया घोषाल अतिशय आलिशान जीवनशैली जगते. श्रेयाची बहुतेक कमाई लाइव्ह शो आणि चित्रपटांमधून येते. श्रेया विविध माध्यामतून दरमहा एक कोटी रुपये कमावते.
श्रेयाने आतापर्यंत एक हजाराहून अधिक बॉलिवूड गाणी गायली आहेत. यामध्ये 'डोला रे डोला', 'सिलसिला ये चाहत का', 'चिकनी चमेली', 'तेरी मेरी', 'तेरे लिए' यांसारख्या अनेक गाण्यांचा समावेश आहे. श्रेया घोषाल हिला अमेरिकेतील ओहायो राज्याकडून सन्मानित करण्यात आलं. याशिवाय ओहायोचे राज्यपाल टेड स्ट्रिकलँड यांनी २६ जून २०१० हा दिवस 'श्रेया घोषाल दिवस' म्हणून घोषित केला. राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही.