पॅन इंडिया सुपरस्टार प्रभासने 'बाहुबली' चित्रपटातून भारतासह जगभरात लोकप्रियता मिळवली. प्रभास सध्या त्याचा बहुचर्चित मेगा बजेट "सालार" चित्रपटाला घेऊन चर्चेत आहे. आज प्रभास (२३ आॅक्टोबर) आपला वाढदिवस. प्रभासचे देशातचं नाहीत तर जगभर चाहते आहेत. साहजिकचं ते त्याच्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतीलच. प्रभासबद्दलच्या अशाच काही गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेला प्रभास सुमारे १८० कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. प्रभास हे त्याचे खरे नाव नाही.‘बाहुबली’ प्रभासचे खरे नाव वेंकट सत्यनारायण प्रभास राजू उप्पलपट्टी आहे. प्रभासची कौटुंबिक पार्श्वभूमी सिनेमाची आहे. त्याचे वडील सूर्यनारायण राजू निमार्ते आहेत. तर काका उप्नापती कृष्णम राजू टॉलिवूड स्टार आहेत.
अमरेंद्र आणि महेंद्र बाहुबलीची भूमिका साकारणारा प्रभास ख-या आयुष्यात इंजिनीअर आहे. त्याने हैदराबादच्या श्री चैतन्य कॉलेजमधून बीटेक केले आहे. पण प्रभासला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचे होते. म्हणजेच प्रभास आहे इंजिनिअर, त्याला करिअर करायचे होते हॉटेल इंडस्ट्रीत अन् तो झाला अभिनेता. एका मुलाखतीत त्याने हा खुलासा केला होता.
प्रभासने 2002 मध्ये प्रदर्शित झालेला ‘ईश्वर’ या तेलुगु सिनेमातून आपल्या सिने कारकिर्दीची सुरुवात केली आहे. आपल्या 14 वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत प्रभासने केवळ 19-20 चित्रपट केले आहेत. बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमीर खानप्रमाणेच प्रभासही वर्षाला एकच चित्रपट करतो. प्रभास राजकुमार हिरानींचा मोठा चाहता आहे. त्याने ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘3 इडियट्स’ 20 हे चित्रपट वेळा पाहिले आहेत.अख्ख जग प्रभासचे चाहते असताना, बॉलिवूडमधील शाहरुख आणि सलमान त्याचे हे आवडते कलाकार आहेत. तर हॉलिवूडमधील रॉबर्ट डिनीरो यांचा तो मोठा फॅन आहे.