Join us  

कबालीबद्दल या दहा गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2016 6:13 AM

रजनिकांत यांना दक्षिणेत केवळ अभिनेताच नव्हे तर देव मानले जाते. रजनिकांत यांचा कबाली हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झालेला आहे. ...

रजनिकांत यांना दक्षिणेत केवळ अभिनेताच नव्हे तर देव मानले जाते. रजनिकांत यांचा कबाली हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झालेला आहे. या चित्रपटाविषयी या खास 10 गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?65 वर्षीय रजनिकांत यांचा हा 159 वा चित्रपट आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच रजनिकांत स्वतःच्या वयाला साजेशी भूमिका साकारणार आहे.सकाळी पाच वाजता प्रदर्शित झालेला कबाली हा भारतातील पहिला चित्रपट ठरला आहेकबाली या चित्रपटाच्या निमित्ताने दक्षिणेकडील अनेक शहरात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना या चित्रपटाची तिकिटे मोफत दिली आहेत. कबाली एकाच दिवशी भारत, चीन, अमेरिका येथे प्रदर्शित करण्यात आला आहे. चीनमध्ये 450 तर अमेरिकेत 400, मलेशिया, जपान आणि इंडोनेशियामध्ये मिळून 300 स्क्रिन्सवर प्रेक्षकांना हा चित्रपट पाहाता येणार आहे. तसेच हा चित्रपट फ्रान्समधील ली ग्रँड रेक्स या जगातल्या सर्वात मोठ्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ली ग्रँड रेक्समध्ये प्रदर्शित होणारा हा पहिला भारतीय चित्रपट आहे.कबालीचे पोस्टरद्वारे एअर एशियाच्या विमानावर प्रमोशन करण्यात आलेले आहे. तसेच चाहत्यांना फर्स्ट डे फर्स्ट शो पाहता यावा, यासाठी एअर एशियाने विशेष विमानसफारीचं आयोजन केलं होते. हे खास विमान बंगळुरुतून उड्डाण घेऊन चेन्नईला उतरले. या विमानाचं तिकीट 7,860 रुपये होते. यामध्ये विमान तिकिटाशिवाय कबाली सिनेमाचं तिकीट, ऑडिओ सीडी, नाश्ता, जेवण, स्नॅक्स यांचा समावेश होता.कबाली हा चित्रपट प्रदर्शनापूर्वी ऑनलाईन लीक झाला असला तरी त्याचा चित्रपटाच्या व्यवसायावर काहीही परिणाम झालेला नाही. अनेक चित्रपटगृहांमध्ये पहिल्या तीन दिवसांचे अॅडव्हान्स बुकिंग झाले असून सगळेच शो हाऊसफुल आहेत. कबाली या चित्रपटाच्या निर्मितीसाठी 160 करोड खर्च करण्यात आला आहे. पण प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाने 200 कोटींची कमाई केली आहे. प्रदर्शनापूर्वी निर्मितीचे पैसे वसूल करणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे.दाक्षिणात्य चित्रपट हे उत्तर भारतात व्यवसाय करत नाही असे अनेक वर्षांपासूनच गणित आहे. उत्तर भारतातल्या 1000 स्क्रिनवर प्रदर्शित होणारा हा पहिला दाक्षिणात्य चित्रपट आहे. कबाली या चित्रपटाच्या ट्रेलरला एका आठवड्यात अडीच कोटी व्ह्युज मिळाले आहेत. कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार असला की त्या चित्रपटातले कलाकार मोठ्या प्रमाणावर चित्रपटाचे प्रमोशन करतात. पण रजनिकांत हे प्रमोशन करत असताना कुठेही पाहायला मिळत नाहीयेत. ते सध्या भारतातही नाहीत. ते अमेरिकेत आपल्या गुरुंना भेटायला गेलेले आहेत.