बऱ्याचदा कलाकार आपल्या बालपणीचे फोटो शेअर करून आठवणींना उजाळा देत असतात. कलाकारांच्या बालपणीचे फोटो पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात. सोशल मीडियावर कलाकारांनी शेअर केलेल्या बालपणीचे फोटो व्हायरल होताना दिसतात. एका अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोतील पोनीटेल बांधलेल्या जांभळ्या रंगाच्या टॉपमधील चिमुकली सर्वांनाच भावली आहे. ही चिमुकली दुसरी कोणी नसून बॉलिवूडची पिग्गी चॉप्स म्हणजेच प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra).
प्रियांका चोप्राने इंस्टाग्रामवर तिच्या आजीसोबतचे फोटो शेअर केले आहेत आणि तिने आजीसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. फोटोत प्रियंका आणि तिची आजी, प्रियांकाची आई मधु चोप्रा आणि तिची बालपणीची मैत्रीण प्रियम माथूर पाहायला मिळत आहेत. प्रियांका जेव्हा ७ वर्षाची होती, तेव्हाचा हा फोटो आहे. प्रियंकाने आजीची आठवण काढत लिहिले की, 'माझे आई-वडील त्यांच्या अभ्यासात आणि वैद्यकीय करिअरमध्ये बिझी असताना आजीने मला वाढवले. माझ्या संस्कारात तिचा खूप मोठा वाटा आहे. मी खरेच नशीबवान आहे की माझ्या आयुष्यात इतके लोक आहेत.
प्रियंका चोप्रा काही महिन्यांपूर्वी सरोगसीच्या माध्यमातून आई झाली आहे. तिने अद्याप तिच्या मुलीची झलक चाहत्यांसोबत शेअर केलेली नाही. बाळाची झलक पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. प्रियंकाच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचे तर ती टेक्स्ट ऑफ यूच्या रिलीजची वाट पाहत आहे. अॅमेझॉनची टीव्ही सीरिज 'सिटाडेल'चे शूटिंगही तिने पूर्ण केले आहे.