‘बाहुबली’ गर्ल तमन्ना भाटियाबद्दलचे हे ‘सत्य’ तुम्हाला माहित आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2017 4:45 PM
‘बाहुबली: दी बिगिनिंग’मध्ये साकारलेल्या अवंतिकाच्या व्यक्तिरेखेने अभिनेत्री तमन्ना भाटिया हिला एक वेगळी ओळख दिली. तिच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले. ...
‘बाहुबली: दी बिगिनिंग’मध्ये साकारलेल्या अवंतिकाच्या व्यक्तिरेखेने अभिनेत्री तमन्ना भाटिया हिला एक वेगळी ओळख दिली. तिच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले. लवकरच तमन्ना ‘बाहुबली: दी कन्क्लुजन’मध्ये दिसणार आहे. पहिल्या भागाच्या तुलनेत ‘बाहुबली’च्या दुस-या भागात तमन्नाची भूमिका काहीशी लहान असणार आहे. खरे तर आपल्यापैकी अनेकजण तमन्नाला दाक्षिणात्य सिनेमाची अभिनेत्री समजतात. पण असे नाहीय. हिंदी सिनेमाशी तमन्नाचे बरेच जुने नाते आहे. अर्थात आजपर्यंत तिने एकही हिट हिंदी सिनेमा दिलेला नाही. तमन्नाने तिच्या अभिनय क्षेत्रातील करिअरची सुरुवात केली, तीच मुळात एका हिंदी चित्रपटातून. सन २००५ मध्य ‘चांद सा रोशन चेहरा’ या हिंदी चित्रपटातून तमन्नाने बॉलिवूड डेब्यू केला होता. पण हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर दणकून आपटला. यानंतर तमन्ना साऊथ सिनेमाकडे वळली आणि इथे तमन्नाची ‘तमन्ना’ पूर्ण झाली. दक्षिण भारतीय सिनेमात तमन्नाने अनेक हिट चित्रपट दिसले. साऊथच्या बहुतांश सर्वच सुपरस्टार्ससोबत तिने स्क्रीन शेअर केलीय. साऊथ सिनेमात मोठे नाव, पैसा, प्रसिद्धी सगळे काही कमावूनही हिंदी सिनेमात नाव कमवण्याची तमन्नाची इच्छा कदाचित अधूरी राहिली. त्यामुळे २०१३ मध्ये तमन्ना पुन्हा एकदा हिंदी चित्रपटसृष्टीत परतली. २०१३ मध्ये तमन्ना साजिद खान यांच्या ‘हिम्मतवाला’मधून तमन्नाने बॉलिवूडमध्ये कमबॅक केले. या चित्रपटात तिच्या अपोझिट होता अजय देवगण. ‘हिम्मतवाला’ हा तमन्नाचा बॉलिवूड डेब्यू असल्याचे त्यावेळी साजिद खान यांनी जाहिर केले होते. पण तमन्ना यापूर्वी सुद्धा बॉलिवूडमध्ये नशीब आजमावून चुकली होती. यानंतर २०१४ मध्ये साजिद यांच्याच ‘हमशकल्स’मध्ये तमन्ना लीड रोलमध्ये दिसली. पण तमन्नाचे हे दोन्ही बॉलिवूडपट फ्लॉप ठरलेत. गतवर्षी तमन्ना ‘तूतक तूतक तूतिया’मध्ये दिसली. पण हा चित्रपट सुद्धा अपयशी ठरला. हिंदी भाषेत डब केलेल्या ‘बाहुबली: दी बिगिनिंग’ने बॉक्सआॅफिस यशाचे सर्व रेकॉर्ड तोडले. पण तांत्रिकदृष््ट्या तमन्नाचा हा हिंदी चित्रपट होता, असे म्हणता येणार नाही. एकंदर काय तर हिंदी चित्रपटात ‘फ्लॉप’ असूनही तमन्ना ‘हिट’ ठरली, ते केवळ ‘साऊथ’ मार्गाने गेल्याने!