तुम्हाला माहीत आहे का सायरा बानू आठ महिन्यांच्या होत्या गर्भवती पण त्यावेळी झाले असे काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 10:03 AM
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचा आज ९५ वा वाढदिवस आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. ...
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचा आज ९५ वा वाढदिवस आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. बॉलिवूडमधील ट्रॅजडी किंग म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांना त्यांच्या अभिनयासाठी आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. दिलीप कुमार आणि सायरा बानू यांना मूल नसल्याचे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, सायरा बानू या गर्भवती होत्या. आठ महिने उलटून देखील गेले होते. पण जन्मायच्या आधीच त्यांच्या बाळाचा मृत्यू झाला.दिलीप कुमार आणि सायरा बानो यांचे लग्न ११ ऑक्टोबर १९६६ ला झाले होते. सायरा दिलीप यांच्यापेक्षा २२ वर्षांनी लहान होत्या. पण सायरा या दिलीप यांच्यावर फिदा होत्या. सायरा यांनी खूप लहान वयातच दिलीप यांच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. दाग हा चित्रपट पाहिल्यानंतर सायरा बानू दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडल्या होत्या. १९६६ ला लग्न झाल्यानंतर सायरा बानू १९७२ ला गर्भवती देखील होत्या. आपल्या कुटुंबात आणखी एका सदस्याची एंट्री होणार म्हणून दिलीप कुमार आणि सायरा बानू दोघे खूपच खूश होते. पण आठवा महिना सुरू असताना सायरा बानू यांना रक्तदाबाचा प्रचंड त्रास व्हायला लागला. बाळाला वाचवण्यासाठी सर्जरी करणे त्यावेळी काही केल्या शक्य नव्हते. त्यामुळे श्वास कोंडून बाळाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर दिलीप आणि सायरा या दोघांना देखील चांगलाच धक्का बसला होता. सायरा बानू यांच्या आयुष्यात ही घटना घटल्यानंतर काही वर्षांनंतर त्यांना आणखी एक धक्का बसला होता. १९८०च्या आसपास दिलीप कुमार आणि आसमा या पाकिस्तानमध्ये राहाणाऱ्या एका स्त्रीचे प्रेमप्रकरण सुरू होते. त्या दोघांची भेट हैद्राबादमध्ये एका मॅचच्या दरम्यान झाली होती. दिलीप आसमा यांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. एवढेच नव्हे तर दिलीप कुमार यांनी आसमा यांच्यासोबत लग्न केले असल्याचे देखील म्हटले जाते. पण दोनच वर्षांत आसमा यांना घटस्फोट देऊन ते सायरा यांच्याकडे परतले होते. Also Read : दिलीप कुमार यांचे वागणे पाहून सेटवरून निघून गेली होती ‘ही’ अभिनेत्री!