आज देशभरात बालदिन साजरा (Childrens Day) केला जातो. बालदिनानिमित्त सर्वजण बालपणींच्या आठवणीत रमून जातात. काही जण सोशल मीडियावर आपल्या बालपणीचे फोटो शेअर करून आपल्या आठवणींना उजाळा देताना दिसतात. यात सेलिब्रेटींचाही समावेश आहे आणि त्यांचे चाहतेदेखील त्यांच्या फोटोंना पसंती देताना दिसतात. दरम्यान या फोटोत ज्या दोन चिमुरड्या दिसत आहेत. त्यांना ओळखलंत ना... नाही...आम्ही तुम्हाला सांगतो त्या दोघी कोण आहेत.
या फोटोत दात पडलेली आणि जीभ बाहेर काढलेली मुलगी म्हणजे अभिनेत्री काजोल (Kajol) आहे तर तिच्या कडेवर तिची धाकटी बहिण तनिषा (Tanisha Mukharjee) आहे. खरंतर बालदिना निमित्ताने अभिनेत्री काजोलनं इंस्टाग्रामवर त्यांच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की, माझ्यातील बालपणाला बालदिनाच्या शुभेच्छा. मॅड रहा, वाईट रहा आणि जसे आहात तसे रहा. जसे तुम्ही आहात, तसे तुम्ही योग्य आहात.
काजोल आणि तनिषाच्या बालपणीच्या फोटोला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे. तिच्या या फोटोवर सेलिब्रेटींसह चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
काजोलनं १९९२ मध्ये तिने 'बेखुदी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, त्यावेळी ती फक्त १६ वर्षांची होती. त्यानंतर १९९३ मध्ये काजोल ‘बाजीगर’ चित्रपटात झळकली. १९९५ साली काजोलचे ‘करण-अर्जुन’ आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हे दोन चित्रपट बॅक टू बॅक हिट ठरले. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’साठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला. काजोलने तिच्या करिअरमध्ये अनेक उत्तम चित्रपट केले.
तनिषाने 'शूssss' या चित्रपटातून पदार्पण केलं. यानंतर 'नील एंड निक्की', 'सरकार राज', 'वन टू थ्री', 'टैंगो चार्ली' चित्रपटात ती झळकली. मात्र हे सगळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले.‘बिग बॉस’सारखे रिअॅलिटी शो सुद्धा केलेत. पण या शोनेही तनीषाला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही.