Join us

रिअल लाईफमध्ये अशी दिसते ‘तेरे नाम’मधील ती वेडसर मुलगी, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2019 8:00 AM

2003 मध्ये आलेला ‘तेरे नाम’ या सिनेमाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. राधे नावाचा कॉलेजमधला एक टपोरी युवक आणि साधी सरळ निर्जला यांची ही लव्हस्टोरी तुफान गाजली होती.

ठळक मुद्दे1999 मध्ये एका तेलगू चित्रपटाद्वारे राधिकाने आपल्या करिअरची सुरुवात केली.

2003 मध्ये आलेला ‘तेरे नाम’ या सिनेमाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. राधे नावाचा कॉलेजमधला एक टपोरी युवक आणि साधी सरळ निर्जला यांची ही लव्हस्टोरी तुफान गाजली होती. या चित्रपटातील सलमानची हेअर स्टाईलही ‘राधे कट’ नावाने ओळखली जाऊ लागली होती. सतीश कौशिक दिग्दर्शित हा सिनेमा ‘सेतु’ या तामिळ सिनेमाचा हिंदी रिमेक होता. या चित्रपटातील एका वेडसर महिलेचा चेहरा तुम्हाला आठवत असेल. वेड्यांच्या इस्पितळात जाणाºया सलमानला रोखण्यासाठी त्याच्या मागे धावत सुटणारी ती वेडसर महिला आणि तो सीन पाहिल्यानंतर अनेकांचे डोळे पाणावले होते. डोळ्यांत पाणी आणणा-या त्या दृश्यातील ती वेडसर महिला दुसरी कुणी नसून एक मोठी नायिका आहे. होय, राधिका चौधरी तिचे नाव.

‘तेरे नाम’मध्ये ती भलेही फाटक्या, मळलेल्या कपड्यात दिसली असेल. पण रिअल लाईफमध्ये ती कमालीची सुंदर आहे. हिंदीसोबतच साऊथच्या अनेक चित्रपटांत तिने काम केलेय.

1999 मध्ये एका तेलगू चित्रपटाद्वारे राधिकाने आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर बॉलिवूडमध्येही ती दिसली. करिना कपूर आणि फरदीन खान स्टारर ‘खुशी’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

‘तेरे नाम’मध्ये राधिकाच्या वाट्याल एकही संवाद आला नाही. पण तिच्या चेह-यावरचे जिवंत भाव बघून प्रेक्षक तिच्या प्रेमात पडलेत. ‘तेरे नाम’नंतर राधिकाने अन्य एक दोन सिनेमे केलेत आणि अचानक अभिनयाला रामराम ठोकला.

यानंतर ती दिग्दर्शनाकडे वळली. 2010 मध्ये लास वेगास फिल्म फेस्टिवलमध्ये तिच्या ‘आॅरेंज ब्लॉसम’ या शॉर्ट फिल्मने सिल्व्हर ऐस अवार्ड जिंकला होता.

टॅग्स :सलमान खान