लाईटस, कॅमेरा, एक्शन विसरून शेती करतोय 'हा' प्रसिद्ध अभिनेता, व्हिडीओ केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 06:00 AM2020-06-25T06:00:00+5:302020-06-25T06:00:02+5:30

‘डन फॉर द दे’, म्हणजेच आजच्यासाठी इतकं पुरे असं म्हणत नवाजनं हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तो शेतामध्ये पंपानं येणाऱ्या पाण्यात हात धुताना दिसत आहे, तर दुसऱ्याच क्षणाला तो शेतकामही करताना दिसत आहे.

"Done For The Day": Nawazuddin Siddiqui Is Working In The Fields Of His Hometown | लाईटस, कॅमेरा, एक्शन विसरून शेती करतोय 'हा' प्रसिद्ध अभिनेता, व्हिडीओ केला शेअर

लाईटस, कॅमेरा, एक्शन विसरून शेती करतोय 'हा' प्रसिद्ध अभिनेता, व्हिडीओ केला शेअर

googlenewsNext

लॉकडाऊनमध्ये अनेक कलाकार घरात बंद होते. वेळ घालवण्यासाठी विविध गोष्टी करताना दिसायचे. शूटिंगमध्ये व्यस्त असलेल्या कलाकारांना लॉकडाऊनमुळे भरपूर वेळ मिळाला अशात अनेकांनी उदरनिर्वाहासाठी विविध पर्याय शोधताना दिसले. कोरोना, लॉकडाऊन आणि या सर्वच परिस्थितीमध्ये प्रत्येकजण अडकून पडला असताना यातून बाहेर पडत नवीन काही तरी करताना पाहायला मिळत आहेत.

त्यातच एखादा व्यक्ती जो कायम ग्लॅमरच्या दुनियेत असतो त्याने काही हटके गोष्ट केली तर चर्चा तर होणारच. आजवर कलाकार मंडळी राजकारण किंवा स्वतःचा व्यवसाय सांभाळताना आपण पाहिलंय. मात्र चित्रपटसृष्टीतल्या एका कलाकार लॉकडाऊनमुळे शेती व्यवसायाकडे वळला आहे. हा अभिनेता आहे नवाजुद्दीन सिद्दीकी. 

ईदच्या आधी नवाझुद्दीन सिद्दीकी मुंबईतून त्याच्या मूळ गावी मुजफ्फरनगरला गेला होता. तेव्हापासून तो तिथेच आहे. एवढंच नाही तर आपला स्टारडम विसरून नवाझ सध्या त्यांच्या शेतात घाम गाळताना दिसत आहे. सोशल मीडियावर नवाजचा हा व्हिडीओ समोर आला आहे.

‘डन फॉर द दे’, म्हणजेच आजच्यासाठी इतकं पुरे असं म्हणत नवाजनं हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तो शेतामध्ये पंपानं येणाऱ्या पाण्यात हात धुताना दिसत आहे, तर दुसऱ्याच क्षणाला तो शेतकामही करताना दिसत आहे. नवाजचा हा अंदाजही त्याच्या भूमिकांप्रमाणंच चाहत्यांची मनं जिंकत आहे. 

Web Title: "Done For The Day": Nawazuddin Siddiqui Is Working In The Fields Of His Hometown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.