ठरले! ‘दोस्ताना 2’ येणार; करण जोहरने केला मोठ्ठा खुलासा!!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 11:35 AM2019-01-30T11:35:36+5:302019-01-30T11:36:16+5:30
‘दोस्ताना’ या चित्रपटाचा सीक्वल अर्थात ‘दोस्ताना 2’ येणार, अशी चर्चा पुन्हा जोरात सुरु आहे आणि या चर्चेत दम आहे.
२००८ मध्ये बॉक्सआॅफिसवर गाजलेल्या ‘दोस्ताना’ या चित्रपटाचा सीक्वल अर्थात ‘दोस्ताना 2’ येणार, अशी चर्चा पुन्हा जोरात सुरु आहे. प्रियांका चोप्रा, जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन स्टारर या चित्रपटाला तरूणाईने डोक्यावर घेतले होते. उण्यापु-या ११ वर्षानंतर या चित्रपटाचा सीक्वल येणार, अशी चर्चा जोरात आहे. ताजी खबर खरी मानाल तर या चर्चेत दम आहे. होय, ‘दोस्ताना’चा निर्माता करण जोहर याने खुद्द हा खुलासा केला आहे. ‘दोस्ताना 2’संदर्भात काही विचार व कल्पनांवर काम सुरु आहे. अर्थात अद्याप अधिकृतपणे काम सुरु झालेले नाही. या चित्रपटासाठी अद्याप कुणाशीही संपर्क साधण्यात आलेला नाही, असे करणने स्पष्ट केले आहे.
For the record.....NO ONE has been officially approached for DOSTANA 2!!!! Some thoughts and ideas are underway but nothing official has moved......
— Karan Johar (@karanjohar) January 30, 2019
एका ताज्या चर्चेनंतर करणने हा खुलासा केला आहे. ‘दोस्ताना 2’च्या प्री- प्रॉडक्शनचे काम सुरु झाले आहे. केवळ इतकेच नाही ‘दोस्ताना 2’मध्ये आलिया भट्ट दिसणार, हे जवळपास नक्की झाले आहे, असे वृत्त एका मीडिया हाऊसने दिले होते. निर्माता करण जोहरने आलियाला ‘दोस्ताना 2’ची कल्पना सांगितली आणि आलियाही ती आवडली. लवकरच ती फायनल स्क्रिप्ट ऐकणार असून यानंतर चित्रपट साईन करेल, अशी शक्यता असल्याचे या वृत्तात म्हटले गेले होते. या वृत्तानंतर करणने लगेच टिष्ट्वटरवर हा खुलासा केला. करणने म्हटल्याप्रमाणे,अद्याप या चित्रपटावर अधिकृतपणे काम सुरु झालेले नाही. पण यावर विचार सुरु आहे. एकंदर काय तर विचार सुरु आहे, केवळ तो पक्का होण्याची ती देर आहे.
मध्यंतरी ‘दोस्ताना 2’च् मध्यंतरी ‘दोस्ताना 2’साठी जान्हवी कपूर आणि दीपिका पादुकोणचे नाव चर्चेत होते. पण आता आलियाच्या नावाची चर्चा आहे. आता यापैकी कोण बाजी मारतो, ते बघूच.
‘दोस्ताना’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर खूपच गाजला होता. जॉन अब्राहमच्या या चित्रपटातील एका सीनची तर प्रचंड चर्चा झाली होती. बिचवर चित्रित करण्यात आलेल्या जॉनचा हा सीन चित्रपटाइतकाच गाजला होता. तरूण मनसुखानीने हा चित्रपट दिग्दर्शित केला होता तर करण जोहर या चित्रपटाचा निर्माता होता.