Drishyam 2 Advance Booking Collection : विजय साळगावकर पुन्हा एकदा परततोय. होय, आम्ही बोलतोय ते ‘दृश्यम 2’ (Drishyam 2 ) या चित्रपटाबद्दल. अजय देवगण (Ajay Devgn), तब्बू (Tabu), श्रिया सरन (Shriya Saran) यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा उद्या 18 नोव्हेंबरला रिलीज होतोय. सेकंड पार्टमध्ये अक्षय खन्नाची (Akshaye Khanna ) एन्ट्री झाल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सध्या ‘दृश्यम 2’ची क्रेझ पाहायला मिळतेय आणि अशात या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगचे आकडे मेकर्सचा आनंद द्विगुणित करणारे आहेत. फॅन्स विजय साळगावकरची पुढची कथा पाहण्यासाठी आतुर आहेत. रिलीजआधीच ‘दृश्यम 2’ने अॅडव्हान्स बुकिंगमधून कोट्यवधीची कमाई केली आहे.
‘दृश्यम 2’ एकूण 3300 स्क्रिन्सवर रिलीज होतोय. ‘दृश्यम 2’ची अॅडव्हान्स बुकिंगची सुरू झाली आणि आत्तापर्यंत 77105 तिकिटं विकली गेली आहेत. रिपोर्टनुसार, पहिल्यादिवशी केवळ अॅडव्हान्स बुकिंगमधून हा सिनेमा 1.68 कोटींची कमाई करू शकतो. अर्थात हे सुरूवातीचे आकडे आहेत. हे कलेक्शन 2 कोटी वा त्यापेक्षा अधिक असू शकतं.
काही रिपोर्टमध्ये केलेल्या दाव्यानुसार, ‘दृश्यम 2’ दोन दिवसांच्या अॅडव्हान्स बुकिंगमधून सुमारे 3 कोटींपर्यंतची कमाई करू शकतो. या हिशेबाने पहिल्या दिवशी अजय देवगणचा हा सिनेमा 4.50 ते 5 कोटींपर्यंतचा गल्ला जमवू शकतो.
‘दृश्यम’चा रेकॉर्ड मोडणार का?‘दृश्यम’ हा सिनेमा 31 जुलै 2015 रोजी रिलीज झाला होता. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने सुमारे 6 कोटींची कमाई केली होती. अशात ‘दृश्यम 2’ हा सिनेमा ‘दृश्यम’चा हा रेकॉर्ड मोडणार का? हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे.
‘दृश्यम’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येऊन सात वर्ष झाली आहे. तब्बल सात वर्षांनी या सिनेमाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘दृश्यम’ हा सिनेमा निशिकांत कामत यांनी दिग्दर्शित केला होता. हा 2013 मध्ये रिलीज झालेल्या एका मल्याळम सिनेमाचा हिंदी रिमेक होता. ‘दृश्यम 2’ हा सुद्धा मल्याळम सिनेमाचाच हिंदी रिमेक आहे. चौथी नापास असलेला विजय आणि त्याच्या कुटुंबाची कथा चाहत्यांना प्रचंड भावली होती. एका हत्या प्रकरणामुळे विजयचं कुटुंब अडचणीत येतं. विजय अतिशय शिताफीनं त्याच्या कुटुंबाला या प्रकरणातून वाचवतो. शेवटपर्यंत खिळवून ठेवणाऱ्या या चित्रपटानं चाहत्यांना वेड लावलं होतं.