Drishyam 2 Box Office Collection Day 2: अजय देवगणच्या (Ajay Devgn) ‘रिलीज होताच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 15.38 कोटींची कमाई केली. शनिवारी दुसऱ्या दिवशी ‘दृश्यम 2’च्या कमाईत 45 टक्के वाढ दिसली. आता चित्रपटाची चौथ्या दिवसाच्या कमाईचा आकडाही समोर आला.
सुमारे 7 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रिलीज झालेल्या दृश्यम’च्या सेकंड पार्टनं अर्थात ‘दृश्यम 2’चा बॉक्स ऑफिसवर डंका आहे. थिएटरमध्ये चित्रपटाचा शो हाऊसफुल्ल होत आहेत. सोमवारीही या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, दृश्यम 2 ने चौथ्या दिवशी 11.87 कोटी रुपये कमावले आहेत.
‘दृश्यम 2’'ने रिलीजच्या चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी 11.87 कोटींची कमाई केली आहे. 4 दिवसांत एकूण 76.01 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या वर्षी अक्षय कुमारचा सर्वात मोठा चित्रपट 'राम सेतू'चा लाइफटाईम कलेक्शन फक्त 74 कोटींहून अधिक होता. म्हणजेच अजय देवगणच्या 'दृश्यम 2'ने अवघ्या 4 दिवसांत 'राम सेतू'च्या कलेक्शनचा रेकॉर्ड मोडला आहे.
दृष्यम 2 ची चार दिवसांची एकूण कमाई 76 कोटींच्या पुढे गेली आहे. पहिल्याच आठवड्यात हा चित्रपट १०० कोटींचा टप्पा पार करेल असा अंदाज आहे.
अशी आहे कथाविजय साळगावकर आणि त्याच्या कुटुंबाची हि कथा आहे. 4 ऑक्टोबर 2014 च्या रात्री घडलेल्या घटनेतील दुसरा ट्रॅक ओपन करत चित्रपटात रंगत आणली आहे. केबल चालवणाऱ्या विजयनं प्रगती केली आहे. घरासमोरील जमिन विकून थिएटर उभारलं आहे. तो चित्रपटाची निर्मितीही करत आहे. त्याची कथा त्यानं पुस्तक रूपात प्रकाशित केली आहे. सॅमची बॉडी न मिळाल्यानं पोलिसांचं शोधकार्य सुरूच आहे. पोलीस कधीही पुन्हा येऊ शकतात हे माहित असल्यानं विजयही गाफील नाही. विजयच्या घरासमोर राहणाऱ्या जेनीला तिचा दारुडा नवरा बेदम मारहाण करत असतो. जेनीला नवऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार करायला विजय सांगतो आणि दुसऱ्या भागात पहिल्यांदा त्याची पोलिसांशी गाठ पडते. त्यानंतर जे घडतं ते पाहण्याजोगं आहे.