Join us

Drishyam 2 : "2 और 3 अक्टुबर को क्या हुआ था याद है ना?"; Drishyam 2 चा उद्या मोठा धमाका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 5:09 PM

Drishyam 2 : 'दृश्यम 2' (Drishyam 2) या थ्रिलर ड्रामाच्या सीक्वलची चाहते आतुरतेने वाट पाहत असतानाच आता अजय देवगणने 'दृश्यम 2' चे एक लक्षवेधी पोस्टर शेअर केलं आहे.

2015 साली रिलीज झालेला अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn), अभिनेत्री तब्बू (Tabbu), श्रिया सरन (Shriya Saran) यांचा ‘दृश्यम’ हा सिनेमा चांगलाच गाजला होता. आता तब्बल 7 वर्षानंतर या चित्रपटाचा सीक्वल भेटीस येत आहे. 'दृश्यम 2' (Drishyam 2) या थ्रिलर ड्रामाच्या सीक्वलची चाहते आतुरतेने वाट पाहत असतानाच आता अजय देवगणने 'दृश्यम 2' चा फर्स्ट लुक रिलीज केला आहे. एक लक्षवेधी पोस्टर शेअर केलं आहे. तसेच चित्रपटाचा टीझर उद्या म्हणजेच गुरुवारी प्रदर्शित होणार असल्याचं देखील म्हटलं आहे. 

अजय देवगणने ट्विटरवरून हे पोस्टर शेअर केलं असून कॅप्शनमध्ये "2 और 3 अक्टुबर को क्या हुआ था याद है ना?" असा प्रश्न विचारला आहे. तसेच विजय साळगावकर कुटुंबासह परतला आहे. दृश्यम 2 चा टीझर उद्या प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं आहे. चौथी नापास असलेला विजय आणि त्याच्या कुटुंबाची कथा चाहत्यांना प्रचंड भावली होती. एका हत्या प्रकरणामुळे विजयचं कुटुंब कसं अडचणीत येतं. विजय अतिशय शिताफीने त्याच्या कुटुंबाला या प्रकरणातून वाचवतो. शेवटपर्यंत खिळवून ठेवणाऱ्या या चित्रपटाने चाहत्यांना वेड लावलं होतं. 

अजयने काही दिवसांपूर्वी ‘दृश्यम 2’ च्या सेटवरील एक स्टिल फोटो शेअर केला होता. यात तो  श्रिया सरन आणि दिग्दर्शक अभिषेक पाठक यांच्यासोबत एका दृश्यावर चर्चा करताना दिसला होता. मुंबईत सिनेमाचं शूटींग सुरू झालं असून लवकरच गोव्यात पुढचं शूटींग होणार असल्याचं म्हटलं होतं. ‘विजय पुन्हा एकदा त्याच्या कुटुंबाचं रक्षण करू शकेल का?’, असं कॅप्शन देत अजयने हा फोटो शेअर केला होता. 

दृश्यम 2 मध्ये अजय विजयची भूमिका साकारणार असून श्रिया त्याची पत्नी नंदिनीची भूमिका साकारणार आहे. तब्बूही या चित्रपटात आहे. काही दिवसांपूर्वीच मूळ मल्याळी भाषेतील ‘दृश्यम 2’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला मिळणारी दाद पाहता हिंदीतही ‘दृश्यम 2’ची घोषणा झाली होती. पहिला भाग ज्या ठिकाणी संपतो, त्याच्या सहा वर्षांनंतरची कथा या दुसऱ्या भागात दाखवण्यात येणार आहे.  

टॅग्स :दृश्यम 2अजय देवगणतब्बू