Join us

विमान रखडलं, बॅगाही येईनात; 'मोये मोये' मूडमधील प्रवाशांना साक्षात शिवमणी पावला, 'हम्मा हम्मा'चा सूर घुमला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 2:14 PM

Drummer Shivamani : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ढोलकी वाजवणारे शिवमणी ४० मिनिटे ड्रमशिवाय आपल्या सामानाची वाट पाहत असलेल्या निराश प्रवाशांचे मनोरंजन करत आहेत.

खराब हवामानामुळे विमानांना उशीर होत असल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत. यावर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. कुणाच्या फ्लाइटला ४ तास लागले तर कुणी ६-८ तास विमानतळावर थांबले. राधिका आपटे, रिचा चढ्ढा, रणवीर शौरी यांसारख्या सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर त्यांना आलेला वाईट अनुभव शेअर केला. उड्डाणांना उशीर झाल्याने लोकांच्या नाराजीच्या अनेक बातम्या तुम्ही वाचल्या असतील, पण कोची विमानतळावरून एक बातमी समोर आली आहे, जिथे विमानाला उशीर झाला तेव्हा 'पद्मश्री' ढोलकी वादक शिवमणी (Drummer Shivamani) यांनी ढोल शिवाय स्टिकने लोकांचे मनोरंजन केले.

खराब हवामानामुळे विमानांना सातत्याने विलंब होत असून, त्यामुळे सोशल मीडियावर प्रवाशांचा रोष पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ढोलकी वाजवणारे शिवमणी ४० मिनिटे ड्रमशिवाय आपल्या सामानाची वाट पाहत असलेल्या निराश प्रवाशांचे मनोरंजन करत आहेत.

त्रस्त झालेल्या प्रवाशांचे केले मनोरंजनफ्लाइटला विलंब होत असल्याच्या वृत्तांदरम्यान कोची विमानतळावरून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. वास्तविक, प्रवासी विमानतळावर पोहोचले आणि त्यांच्या सामानाची वाट पाहू लागले. आधी विमानाला होणारा विलंब आणि नंतर सामानासाठी लांबलचक प्रतीक्षा यामुळे लोक नाराज होत होते. या प्रवाशांमध्ये ‘पद्मश्री’ ढोलकी वादक शिवमणी देखील होते. जेव्हा त्यांनी लोकांना निराश आणि अस्वस्थ होताना पाहिले तेव्हा त्यांनी ड्रमची काठी घेतली आणि लोकांचे मनोरंजन करण्यास सुरुवात केली.

शिवमणींचा एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरलआश्चर्याची बाब म्हणजे शिवमणी यांनी ढोल-ताशाशिवाय लोकांचे मनोरंजन केले. ते एक्सीलरेटर्सजवळ पोहोचले आणि ड्रम स्टिक्ससह १९९५ सालातील रोमँटिक ड्रामा फिल्म 'बॉम्बे' मधील 'हम्मा हम्मा' हे प्रसिद्ध गाणे वाजवू लागले. त्यांना वाजवताना बघून शेजारी उभ्या असलेल्या लोकांनी त्यांचा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. या व्हिडीओला खूप पसंती मिळत आहे.

कोण आहेत शिवमणी?१ डिसेंबर, १९५९ रोजी तामिळनाडूमध्ये जन्मलेल्या शिवमणी यांना 'ड्रम्स शिवमणी' म्हणून ओळखले जाते. शिवमणी ढोल, ऑक्टोबन, दर्बुका, उदुकाई, घटम आणि कांजिरा यासह अनेक वाद्ये वाजवतात.२००८ आणि २०१० मध्ये आयपीएल चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी ड्रमवादनाचे प्रात्यक्षिक दाखवले. २०१९ मध्ये त्यांना 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिवमणी यांनी एआर रहमानसोबत जगभर दौरा केला आणि 'बॉम्बे ड्रीम्स'साठी त्यांच्यासोबत काम केले. ते 'श्रद्धा' नावाच्या संगीत समूहाचाही भाग होता ज्यात शंकर महादेवन, हरिहरन, यू. श्रीनिवास आणि लॉय मेंडोन्सा यांचा समावेश होता. २००९ मध्ये, शिवमणी यांना तमिळनाडू सरकारने कला क्षेत्रातील सर्वोच्च राज्य सन्मान 'कलीममणी' ही पदवी प्रदान केली.