‘दृश्यम 2’च्या अॅडव्हान्स बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे सिनेमा दमदार ओपनिंग करणार, हे ठरलं होतं. झालंही तसंच. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 15.38 कोटींची कमाई केली. शनिवारी दुसऱ्या दिवशी ‘दृश्यम 2’च्या कमाईत 40 टक्के वाढ दिसली. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 21,59 लाखांचा गल्ला जमवला. तर, तिसऱ्यादिवशी म्हणजे रविवारी सर्वाधिक 27.17 कोटींची कमाई चित्रपटाने केली. तिसऱ्या दिवशी 26 टक्क्यांची वाढ दिसून आली. त्यामुळे, चित्रपटाने यंदाच्या वर्षातील दुसरी सर्वात मोठी ओपनिंग दिली असून तीन दिवसांत 64.14 कोटी रुपयांचा गल्ला दृश्यम 2 ने जमवला आहे.
बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालात. 'दृश्यम 2' मास सर्किट्समधून मोठ्या प्रमाणात कमाई करत आहे. तर CI मार्केटमध्ये रविवारी सुमारे 1 कोटी रुपयांची भर पडली आहे. मात्र, चालू आठवड्यातही चित्रपटाला प्रतिसाद कायम राहतो का हे पाहावे लागणार आहे. 'दृश्यम 2' चे दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केले असून या सिक्वलमध्ये अजय देवगण विजय साळगावकरच्या भूमिकेत पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर परतला आहे. आपल्या कुटुंबाच्या प्रभावी सुरक्षेसाठी त्यानं लावलेलं डोकं कौतुकास्पद ठरत आहे. या चित्रपटात तब्बू, श्रिया सरन आणि अक्षय खन्ना यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. तर, इशिता दत्ता, मृणाल जाधव आणि रजत कपूर हेही भूमिका साकारत आहेत.
दिग्दर्शक अभिषेक पाठक म्हणतात
दृश्यम 2 चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद जबरदस्त आहे! मला माहित आहे की मी एक प्रामाणिक चित्रपट बनवला आहे. जो मूळ चित्रपटाचा आंधळा रिमेक नव्हता. माझ्या टीममधील प्रत्येकाने यासाठी खूप मेहनत घेतली. पण, प्रेक्षकांचे प्रेम अप्रतिम आणि सर्व अपेक्षांच्या पलीकडचे आहे. मी खरोखर आनंदी आहे. पहिल्या दिवसाचे कलेक्शन चांगले होईल अशी मला अपेक्षा होती. पण, नंतर ते माझ्या अपेक्षेच्यापलीकडे गेले आहे.