Join us

उर्वशी रौतेलाच्या बर्थ डे सेलिब्रेशनवर पुलकित सम्राटने फेरले पाणी, वाचा काय आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 15:17 IST

उर्वशी रौतला सध्या पागलपंतीचे शूटिंग करतेय. त्यामुळे उर्वशीचे बर्थ डे सेलिब्रेशन सेटवरच करण्याचे ठरवण्यात आले. बर्थ डे लिब्रेशनला घेऊन उर्वशी खूपच खुश होती.

ठळक मुद्देसध्या पागलपंतीच्या शूटिंगसाठी संपूर्ण टीम लंडनमध्ये आहे त्यामुळे मेकर्सनी सेटवरच केक कापून सेलिब्रेशन करण्याचे ठरवले

उर्वशी रौतला सध्या पागलपंतीच्या शूटिंग करतेय. त्यामुळे उर्वशीचे बर्थ डे सेलिब्रेशन सेटवरच करण्याचे ठरवण्यात आले. बर्थ डे लिब्रेशनला घेऊन उर्वशी खूपच खुश होती मात्र तिचा हा आनंद फारकाळ राहिला नाही. या मागचे कारण आहे पुलकित सम्राट त्याचे झाले असे की, सध्या पागलपंतीच्या शूटिंगसाठी संपूर्ण टीम लंडनमध्ये आहे.

उर्वशीच्या बर्थ डेच्या सिनेमाच्या पहिला शेड्यूलचे शूटिंग संपणार होते. त्यामुळे मेकर्सनी सेटवरच केक कापून सेलिब्रेशन करण्याचे ठरवले. या प्लॅनला घेईन उर्वशीदेखील एक्साइटेड होती. मात्र मेकर्सच्या या प्लॅनवर पुलकितने पाणी फेरले. त्यांने सेलिब्रेशनचा भाग बनण्यास नकार दिला. पुलकितसोबत कृति खरबंदादेखील नकार दिला. त्यामुळे मेकर्सनी सेलिब्रेशनचा प्लॅनच कॅन्सल केला. 

तुम्हाला प्रश्न पडला असेल की पुलकित नक्की असा का वागला? पुलकितच्या या वागण्या मागे जुना इतिहास आहे. सनम रे च्या शूटिंग दरम्यान पुलकित आणि यामी गौतमच्या अफेअर उर्वशीनेच सगळ्यांसमोर आणले होते. त्यानंतर  दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आला. पागलपंतीमध्ये  पुलकित-कृतिसह जॉन अब्राहम, इलियाना डिक्रूज, अर्शद वारसी आणि उर्वशी रौतला यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार, कुमार मनघट आणि अभिषेक पाठव मिळून करतायेत. सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला कधी होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.  

टॅग्स :उर्वशी रौतेलाकृति खरबंदा