Join us

​या कारणामुळे राजेश खन्ना आणि डिम्पल कपाडियामध्ये आला होता दुरावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 11:12 AM

राजेश खन्ना यांचा आज वाढदिवस असून त्यांचा आणि त्यांची मुलगी ट्विंकल खन्ना यांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. राजेश खन्ना ...

राजेश खन्ना यांचा आज वाढदिवस असून त्यांचा आणि त्यांची मुलगी ट्विंकल खन्ना यांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. राजेश खन्ना हे बॉलिवूडमधील एक सुपरस्टार होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांना त्यांच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आले आहे. राजेश खन्ना यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधील सगळ्यात मोठा सुपरस्टार हरपला अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या होत्या.राजेश खन्ना यांच्या व्यवसायिक आयुष्यासोबत त्यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले. राजेश खन्ना आणि अभिनेत्री अंजू महेंद्रू अनेक वर्षं नात्यात होते. ते लग्न करणार असे सगळ्यांना वाटत असताना राजेश खन्ना यांनी अभिनेत्री डिम्पल कपाडियासोबत लग्न केले. डिम्पल आणि त्यांच्यामध्ये जवळजवळ १५ वर्षांचे अंतर होते. पण राजेश खन्ना यांनी लग्नासाठी विचारल्यानंतर डिम्पल यांनी एकाही क्षणाचा विचार न करता त्यांना होकार दिला. राजेश खन्ना हे त्या काळात सुपरस्टार असल्याने डिम्पल आणि त्यांचे लग्न धुमधडाक्यात झाले होते. लग्नानंतर वर्षभरातच त्यांच्या आयुष्यात ट्विंकल आणि काहीच वर्षांत रिंकी आली.डिम्पलचा बॉबी हा पहिलाच चित्रपट गाजला होता. या चित्रपटातील डिम्पलच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. पण राजेश खन्ना यांच्यासोबत लग्न केल्यानंतर डिम्पलने बॉलिवूडला रामराम ठोकला. डिम्पल तिच्या संसारात रमली होती. पण कुठेतरी तिच्या मनात बॉलिवूडमध्ये परतण्याची इच्छा होती. मात्र आपल्या बायकोने पुन्हा बॉलिवूडमध्ये येऊ नये असे राजेश खन्ना यांचे म्हणणे होते. त्यावरून त्यांच्यात अनेकवेळा मतभेद देखील होत असत. पण डिम्पलने याकडे दुर्लक्ष करून संसारात मन गुंतवले होते. पण याच दरम्यान राजेश खन्ना यांच्या आयुष्यात टिना मुनिम आली. टिना आणि राजेश खन्ना यांनी जवळजवळ ११ चित्रपटात एकत्र काम केले. त्यांच्या अफेअरची जोरदार चर्चा सुरू झाल्यानंतर डिम्पलने या नात्यातून बाहेर पडणेच पसंत केले. डिम्पल आणि राजेश खन्ना अनेक वर्षं वेगळे राहात असले तरी त्यांनी आपल्या मुलींसाठी कधीच घटस्फोट घेतला नाही. Also Read : राजेश खन्ना नव्हे तर हा अभिनेता होता आनंद या चित्रपटासाठी हृषिकेश मुखर्जी यांची पहिली चॉईस