या कारणामुळे संजय दत्तने खाल्ला होता वडील सुनील दत्त यांच्याकडून बेदम मार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2018 6:10 AM
गेल्या अनेक दिवसांपासून संजय दत्तचे फॅन्स त्याच्या बायोपिकचा टीझर आणि पोस्टर लाँच कधी होतेय याची वाट मोठ्या आतुरतेने बघत ...
गेल्या अनेक दिवसांपासून संजय दत्तचे फॅन्स त्याच्या बायोपिकचा टीझर आणि पोस्टर लाँच कधी होतेय याची वाट मोठ्या आतुरतेने बघत होते. नुकतेच 'संजू'चे पहिले पोस्टर आणि टीझरदेखील रिलीज करण्यात आले. या टीझर लाँचच्या वेळी संजय दत्ताच्या आयुष्याविषयी काही सिक्रेट त्याच्या मित्रांनी सांगितले. संजय दत्त हा नेहमीच मीडिया फ्रेंडली आहे. त्याने आजवर त्याच्या अनेक मुलाखतींमध्ये त्याच्या आयुष्याविषयीची अनेक गुपिते मीडियासमोर मांडली आहेत. त्याच्या वडिलांनी म्हणजेच अभिनेते सुनील दत्त यांनी एका कारणामुळे संजयला बेदम मारले होते. हे कारण काय होते आणि त्यावेळी काय घडले होते हे संजयने अनेक वर्षांपूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते.संजय दत्त आणि त्याचे वडील सुनील दत्त यांचे नाते वडील-मुलाप्रमाणे नव्हे तर मित्रांप्रमाणे होते. संजय दत्तच्या मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटात देखील खास संजयसाठी सुनील दत्त यांनी काम केले होते. सुनील दत्त यांनी बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. सुनील दत्त आणि नर्गिस यांच्या पावलावर पाऊल ठेवून संजयनेदेखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि खूपच चांगल्या भूमिका साकारल्या. संजय दत्तने त्याच्या तरुणपणातील एक किस्सा एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितला होता. तो सांगतो, मी पहिल्यांदा बाथरुममध्ये लपून सिगारेट पित होतो, तेव्हा अचानक माझे वडील तिथे आले. मला सिगारेट ओढताना पाहून त्यांना प्रचंड राग आला होता. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण त्यांनी त्यावेळी मला बुटाने मारले होते. त्यांचा तो मार मी आजदेखील विसरू शकत नाही. संजू या चित्रपटात संजय दत्तच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना उलगडण्यात येणार आहेत. संजू या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये रणबीर कपूर संजय दत्तच्या पाच वेगवेगळ्या अवतारात पाहायला मिळतो आहे. संजूची भूमिका साकाराण्यासाठी रणबीर कपूरने प्रचंड मेहनत घेतली आहे. त्याला या चित्रपटाकडून अनेक अपेक्षा आहेत. विधू विनोद चोपडा या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. त्याव्यतिरिक्त विक्की कौशल, सोनम कपूर, दिया मिर्झा, मनीषा कोइराला आणि अनुष्का शर्मा यांच्याही या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटात महेश भट्ट आणि संजय दत्त हेदेखील गेस्ट अॅपियरेंस करताना दिसणार आहेत. चित्रपट २९ जून २०१८ ला प्रदर्शित होणार आहे. Also Read : बराक ओबामा संजय दत्तला ओळखतात या नावाने