अनेक सेलिब्रिटी बॉलिवूडमधील गटबाजीचा उल्लेख करतात आणि सांगतात की या गटाचा भाग न राहिल्यामुळे त्यांना इंडस्ट्रीत किती संघर्ष करावा लागला. करिअरवरही परिणाम झाला, मात्र आश्चर्यकारक बाब म्हणजे डेझी शाह(Daisy Shah)च्या बाबतीत मात्र उलट चित्र आहे. कॅम्पचा भाग असल्यामुळे डेझीची चांगली कारकीर्द खराब झाली. याचा खुलासा नुकताच डेझी शाहने केला आहे. डेझीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, चित्रपट निर्मात्यांनी तिला त्यांच्या चित्रपटांमध्ये कास्ट केले नाही कारण ती एका ग्रुपची भाग होती.
हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत डेझी म्हणाली की, " बॉलिवूडमध्ये गटबाजी अस्तित्वात आहेत आणि मी त्यापैकी एक भाग आहे. मला त्या श्रेणीत टाकण्यात आले आणि इंडस्ट्रीतील लोक म्हणाले की तुम्ही त्याचा एक भाग आहात. माझ्यासोबत असे अनेकवेळा घडले आहे जेव्हा चित्रपट निर्माते म्हणायचे, 'आम्ही ऑफर देऊ. आमचा एक प्रकल्प आहे. त्यासाठी कास्ट करायचे आहे, पण आम्हाला वाटते की तुम्ही त्या गटाचा भाग आहात, त्यामुळे तुमची फी देण्यासाठी आमच्याकडे पुरेसे बजेट नाही.' चित्रपटाची कथा चांगली असती तर मी नक्कीच काम केले असते."
चित्रपट न मिळाल्याने डेझी झाली होती नाराजडेजी शाहने पुढे सांगितले की, काम नसल्यामुळे मानसिक तणाव येऊ लागला, घराबाहेरही पडणे बंद केले होते. ती म्हणाली की, "त्या गोष्टीचा माझ्यावर खरोखर परिणाम झाला. असे दिवस होते जेव्हा मी खूप अस्वस्थ व्हायचे, मला माझे घर सोडायचे नव्हते किंवा कोणाला भेटायचे नव्हते. मी माझ्या करिअरबद्दल अजिबात समाधानी नव्हते.कारण, बॉलिवूडमधील गटांमुळे माझे करिअर अजूनही सुरु झालेले नाही.”
वाईट काळातून बाहेर पडली डेझी शाहडेझी शाहने खुलासा केला की, आता ती त्या काळातून बाहेर पडली आहे आणि सकारात्मकतेकडे लक्ष देत आहे. ती म्हणाली की, तिचे दोन चित्रपट १०० कोटींचे होते, जे आतापर्यंत बऱ्याच सेलेब्सकडेही नाहीत. तिला इंडस्ट्रीकडून खूप काही मिळाले आहे. तिला इंडस्ट्रीकडून खूप काही मिळालं आहे. त्यामुळे जे मिळालं नाही, त्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी जे मिळाले त्यात खूश आहे आणि भवितव्याकडे पाहत आहे.
वर्कफ्रंट...डेझी शाहच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने सलमान खानच्या जय हो चित्रपटात काम केले आहे. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. सध्या ती खतरों के खिलाडी १३मध्ये पाहायला मिळत आहे.