2023 मध्ये बॉलिवूडपासून दक्षिणेपर्यंतचे अनेक चित्रपट पायरसीचे बळी ठरले आहेत. 2023 मध्ये आतापर्यंत 'द केरळ स्टोरी', 'पठाण', 'जवान', 'गदर 2'सह अनेक मोठे चित्रपट रिलीज होताच लीक झाले. पण त्याचा चित्रपटाच्या कमाईवर कोणताही परिणाम झाला नाही. आता या यादीत शाहरुख खानच्या 'डंकी' चित्रपटाचेही नाव जोडले गेले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानचा चित्रपट 'डंकी' रिलीज होताच ऑनलाइन लीक झाला आहे. अनेक ऑनलाइन साइट्सवर 'डिंकी' चित्रपट एचडीमध्ये लीक केला आहे.
शाहरुख खान आणि विकी कौशलचा 'डंकी' चित्रपट रिलीज होताच तो अनेक ऑनलाईन साइटवर ऑनलाइन लीक झाला आहे. या साइट्सवर हा चित्रपट पूर्णपणे HD गुणवत्तेत उपलब्ध आहे. चित्रपट ऑनलाइन लीक झाल्यामुळे 'डिंकी'च्या कमाईवर परिणाम होऊ शकतो, असे मानले जात आहे. पण याआधीही अनेक चित्रपट लीक झाले आहेत, परंतु त्यांचा चित्रपटांच्या कमाईवर विशेष परिणाम होऊ शकला नाही. आता त्याचा 'डंकी' चित्रपटावर किती परिणाम होतो हे पाहावे लागेल.
'सॅकनिल्क'ने दिलेल्या रिपोर्टनुसार 'डंकी'ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे. या सिनेमाने प्रदर्शनाच्या दिवशी ३० कोटींचा गल्ला जमवला आहे. शाहरुख खानच्या 'डंकी' सिनेमाचं दिग्दर्शन राजकुमार हिराणी यांनी केलं आहे. या सिनेमात शाहरुखने 'हार्डी' हे पात्र साकारलं आहे. तर विकी कौशल, तापसी पन्नू, विक्रम कोचर, बोमन इराणी या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'डंकी'मधील शाहरुखबरोबरच विकीच्या भूमिकेचंही कौतुक होत आहे.