Join us

डंकी की सुहानाचा द आर्चीज? दोघांपैकी 'या' सिनेमासाठी शाहरूख खान उत्सुक, स्वत:च दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 19:58 IST

शाहरुख सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. नुकतेच शाहरुखने ‘आस्क एसआरके’ सेशन केलं होतं

बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खान नेहमीच चर्चेत असते. लवकरच शाहरुख 'डंकी' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर शाहरुखची लाडकी लेक सुहाना खानचाही 'द आर्चीज' सिनेमा डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या दोन सिनेमापैकी कोणत्यासाठी शाहरुख उत्साहित असा प्रश्न एका चाहत्याने शाहरुखला केला. यावर किंग खानने भन्नाट उत्तरं दिलं.

शाहरुख सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. नुकतेच शाहरुखने ‘आस्क एसआरके’ सेशन केलं होतं, ज्यामध्ये चाहत्यांनी शाहरुखला सर्व प्रकारचे प्रश्न विचारले. एका युजरने विचारलं,  'डंकी' आणि 'द आर्चीज' या दोन सिनेमापैकी कोणत्यासाठी शाहरुख उत्साहित आहे. यावर शाहरूख खान म्हणाला, सुहानाला डंकी आवडतो आणि मला 'द आर्चीज'. मला असं वाटतं आपल्या दोघांमध्ये सारं काही ठिक आहे'.  

तर आणखी एका युजरने शाहरुखला ‘डंकी’ चित्रपट थिएटरमध्ये नाही तर स्टेडियममध्ये दाखवण्याची विनंती केली. यावर शाहरुख म्हणाला, 'होय, मी टीमलाही सांगितलं पण एअर कंडिशनिंग ही समस्या आहे. तुम्हाला या चित्रपट पाहण्यासाठी लहान मुलांसह आणि मोठ्यांबरोबर जावं लागेल…एसी नसेल तर अस्वस्थ होईल म्हणून हा चित्रपट २१ डिसेंबरला चित्रपटगृहातच प्रदर्शित करूयात'.

पठाण आणि जवानच्या दमदार यशानंतर किंग खानचे चाहते त्याला ‘डंकी’मध्ये पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ चित्रपट २२ डिसेंबर रोजी रिलीज होईल. या चित्रपटात शाहरुख खान, तापसी पन्नू, विकी कौशल, सतीश शाह आणि बोमन इराणी यांच्या भूमिका आहेत.

टॅग्स :शाहरुख खानसुहाना खानबॉलिवूड