Join us

​‘१९२१’ या हॉरर सिनेमाच्या शूटींगदरम्यान कॅमे-यात कैद झाले भूत!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2018 9:40 AM

विक्रम भट्ट दिग्दर्शित ‘१९२१’ या हॉरर चित्रपटाचे शूटींग आता पूर्ण झाले आहे. लवकरच हा चित्रपट रिलीज होणार आहे. तुम्हाला ...

विक्रम भट्ट दिग्दर्शित ‘१९२१’ या हॉरर चित्रपटाचे शूटींग आता पूर्ण झाले आहे. लवकरच हा चित्रपट रिलीज होणार आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण दिग्दर्शक विक्रम भट्ट यांनी या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अनेक हॉन्टेड जागा निवडल्या. यात युकेतील अतिशय भयावह जागांचा समावेश होता. या ठिकाणचा चित्रीकरणारदरम्यानचा अनुभवही तसाच भयावह राहिला. होय, या शूटींगदरम्यान कॅमे-यात काही पॅरानॉर्मल गोष्टीही शूट झाल्यात. खरे तर आम्ही या लोकेशन्सवर शूट केले, असे विक्रम यांनी सांगितल्यावर लोकांना आधी ते खोटे वाटले. कारण या लोकेशन्सवर जाण्याचीच काय पण त्याबद्दल बोलण्याचीही हिंमत लोक करत नाहीत.  विक्रम यांनी या लोकेशन्सवरचे काही फोटो शेअर केलेत. हे फोटो पाहून लोकांची घाबरगुंडी उडाली नसेल तर नवल. या फोटोत शूटदरम्यान कॅमे-यात काही पॅरानार्मल म्हणजे, भूतसदृश्य वस्तू कैद झालेल्या दिसत आहेत.विक्रम भट्ट यांनी दक्षिण यार्कशायर येथे शूटींग केले. ही जागा चित्रविचित्र गोष्टींसाठी ओळखली जाते. त्यामुळे याठिकाणी शूटींग करताना संपूर्ण टीमला एकत्र राहण्याचे आदेश देण्यात आले होते. कुणीही एकटे इकडे तिकडे भटकता कामा नये, असे त्यांना बजावण्यात आले होते.‘१९२१’ हा चित्रपट बॉलिवूडच्या आत्तापर्यंतच्या भयपटांमध्ये एक नवा आदर्श निर्माण करेल, असा दावा विक्रम भट्ट यांनी केला आहे.  या चित्रपटाचे शूटींग गत आॅगस्टमध्येच संपले. चित्रपटातील पात्र त्यांचा वर्तमान सुरक्षित करण्यासाठी भूतकाळातील अनेक रहस्यांशी सामना करताना दिसणार आहेत. जीवन आणि मृत्यू यातील संघर्ष यात दिसणार आहे. हा चित्रपट ‘१९२०’चा सीक्वल आहे. ‘१९२०’ प्रमाणेच या चित्रपटात एक रोमॅन्टिक आणि इमोशनल कथा पे्रक्षकांना पाहायला मिळणार आहे. ALSO READ : 1921 : पुन्हा एक हॉरर सिनेमा...पाहा ट्रेलर!!या चित्रपटात विक्रम भट्ट एलईडी लाईट्सवाला भूत दाखवणार आहे. यात भूताचा चेहरा दिसत नाही तर केवळ त्याच्या डोळ्यांत प्रकाश दिसतो. आता हा भूत पाहून तुम्ही हसता की घाबरता, हे तुमच्यावर अवलंबून आहे.विक्रम भट्ट यांनी सन २००२ मध्ये ‘राज’पासून भयपटांची सुरुवात केली होती. ‘राज’ या चित्रपटात बिपाशा बसू आणि डिनो मोरिया लीड रोलमध्ये होते. २००८ मध्ये विक्रम यांचा ‘१९२०’ रिलीज झाला होता. २०१० मध्ये ‘शापित’ आणि २०११ मध्ये ‘हॉन्टेड’ हा पहिला ३ डी हॉरर सिनेमा विक्रम भट्ट घेऊन आले होते.