अभिनेता कार्तिक आर्यनने 'प्यार का पंचनामा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर 'सोनू के टिटू की स्वीटी' आणि 'लुका छुपी' या चित्रपटातील भूमिकेतून त्याने रसिकांवर चांगलीच भुरळ पाडली आहे. 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये कार्तिकने इंडस्ट्रीत येण्यासाठी त्याला किती स्ट्रगल करावा लागला आणि या काळात सर्वाधिक मदत कोणाची झाली हे त्याने सांगितले.
स्ट्रगलिंगच्या काळात कार्तिकला सोशल मीडियाची फार मदत झाल्याचे तो सांगतो. तो पुढे म्हणाला, 'अभिनेता, स्टार होण्यासाठी मला सोशल मीडियाने फार मदत केली. ऑडिशन्सबद्दल सर्च करण्यासाठी मी सतत फेसबुक आणि गुगलची मदत घ्यायचो. इंडस्ट्रीत मला कोणाबद्दलच फारशी माहिती नसल्याने सोशल मीडिया हा एकच पर्याय माझ्यासमोर होता. अॅक्टर्स हवे आहेत किंवा कास्टिंग कॉल्स असे की-वर्ड टाकून मी सर्च करत होतो. या काळात २ बीएचके फ्लॅटमध्ये १२ स्ट्रगलर्ससोबत राहत होतो.'