सुशांत प्रकरणी ED पुन्हा अॅक्शन मोडमध्ये, दिग्दर्शक दिनेश विजान यांच्या घरावर छापा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 03:16 PM2020-10-14T15:16:21+5:302020-10-14T15:20:10+5:30
सुशांतने दिनेशसोबत ‘राब्ता’ हा सिनेमा केला होता. या सिनेमात सुशांत व क्रिती सॅनन लीड रोलमध्ये होते.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूला आज बरोबर 4 महिने पूर्ण झालेत. याचदरम्यान सुशांत प्रकरणाचा तपास करणा-या अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने पुन्हा अॅक्शन मोडमध्ये येत दिग्दर्शक दिनेश विजान यांच्या घरी व ऑफिसमध्ये छापेमारी केली. सुशांतने दिनेशसोबत ‘राब्ता’ हा सिनेमा केला होता. या सिनेमात सुशांत व क्रिती सॅनन लीड रोलमध्ये होते.
टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, ‘राब्ता’ या सिनेमाबाबत झालेल्या पैशांच्या व्यवहारासंबंधी ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिग्दर्शक दिनेश यांची चौकशी केली. त्यांच्याकडून काही कागदपत्रही ताब्यात घेण्यात आलीत.
गेल्या सप्टेंबर महिन्यातही ईडीने तब्बल 8 तास दिनेश विजान यांची चौकशी केली होती. रिपोर्टनुसार, ‘राब्ता’शिवाय सुशांत व दिनेश यांच्यात आणखी एका चित्रपटावर चर्चा झाली होती. मात्र हा सिनेमा बनू शकला नाही.‘राब्ता’हा सिनेमा 9 जून 2019 रोजी प्रदर्शित झाला होता.
#Breaking | ED raids residence of filmmaker Dinesh Vijan as it probes the financial angle in the death of Sushant Singh Rajput.
— TIMES NOW (@TimesNow) October 14, 2020
Details with Bhavatosh. pic.twitter.com/dOI7dRJeta
रियाविरुद्ध ईडीकडे नाही एकही सबळ पुरावा!!
चार महिन्यानंतरही सुशांतच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आलेले नाही. सीबीआय, ईडी, एनसीबी अशा तपास यंत्रणा अद्यापही सुशांतप्रकरणाचा तपास करत आहेत. सुशांतच्या कुटुंबीयांनी सुशांतच्या खात्यांमध्ये अफरातफर झाल्याचा संशय व्यक्त केला होता. रिया चक्रवर्तीने सुशांतला लुबाडल्याचा आरोपही सुशांतच्या कुटुंबीयांनी केला होता.यानंतर ईडीची सुशांत प्रकरणात एन्ट्री झाली होती.
सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी रिया, तिचे कुटुंबीय आणि सुशांतचे सीए व मॅनेजर यांनी कारस्थान करून त्याचे १५ कोटी हडप केल्याची तक्रार पटना पोलिसांकडे दिली होती. हा तपास सीबीआयकडे वर्ग केल्यानंतर ईडीनेही जुलैअखेरीस त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. सुरुवातीला सीए श्रुती मोदी, मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि त्यानंतर शोविक, रिया व तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांची स्वतंत्रपणे कसून चौकशी केली. सुशांतसह या सर्वांचे बँक अकाउंट, कॅश, डेबिट कार्ड, आॅनलाइन बँकिंग आदी सर्व व्यवहार, त्यांचा गेल्या तीन वर्षांतील आयकर परतावा (आयटीआर) तपासला.
इंद्रजीत चक्रवर्ती यांनी कॅनरा बँकेच्या वाकोल्यातील शाखेत ठेवलेले लॉकर अधिका-यांनी उघडून पडताळले. मात्र शेकडो तासांची चौकशी, बँक व्यवहाराची पडताळणी केल्यानंतरही काहीच आक्षेपार्ह सापडले नाही.
सुशांत, रियाच्या युरोप ट्रिप व काही शॉपिंगचा खर्च सुशांतच्या खात्यावरून झाला आहे. मात्र ही रक्कम फार मोठी नाही. सुशांत व रिया ‘लिव्ह इन’मध्ये राहत असल्याने तो आक्षेपार्ह म्हणता येत नसल्याचे ईडीचे मत आहे.
रिया विरोधात ईडीच्या हाती नाही लागले धागेदोरे, अकाउंटमध्ये नाही सापडली मोठी रक्कम
मी नाही पाहिले, कोणाकडून तसे ऐकले होते...! सीबीआयसमोर रिया चक्रवर्तीच्या शेजारी महिलेचा युटर्न