राजीव कपूर यांचे काहीच दिवसांपूर्वी निधन झाले. गेल्या वर्षभरात कपूर कुटुंबावर हा तिसरा मोठा आघात आहे. ऋषी कपूर यांचे निधन एप्रिल महिन्यात झाले. ऋषी कपूर यांच्या निधनाच्या दोन महिन्याआधीच त्यांची मोठी बहीण रितू नंदा यांचे निधन झाले होते. या दु:खातून कपूर कुटुंब सावरत असतानाच राजीव कपूर यांची प्राणज्योत मालवली. कपूर कुटुंबावर एकामागोमाग एक संकटं येत आहेत. आता कपूर कुटुंबावर आणखी एक संकट आले आहे.
राज कपूर यांचा नातू अरमान जैनच्या घरावर इडीने नुकताच छापा घातला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी अरमानचे नाव आले असल्यामुळे हा छापा घालण्यात आला होता. हा छापा राजीव कपूर यांच्या निधनाच्या काही तास आधीच घालण्यात आला होता. पोलिसांची कारवाई झाल्यानंतर अरमानला राजीव यांच्या अंत्यसंस्काराला जाण्याची परवानगी देण्यात आली होती.
अरमान हा राज कपूर यांची मुलगी रिमा जैन आणि मनोज जैन यांचा मुलगा आहे. रिमा ही ऋषी कपूर, रणधीर कपूर आणि राजीव कपूर यांची बहीण आहे. अरमानने सुरुवातीला बॉलिवूडमध्ये जम बसवण्याचा प्रयत्न केला. सर्वप्रथम त्याने करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द ईअर’ आणि ‘एक मैं और एक तू’ या चित्रपटांसाठी अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले. यानंतर हिरो म्हणून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. २०१४ साली अरमानने ‘हम दीवाना दिल’ या चित्रपटामधून बॉलिवूड डेब्यू केला होता. पण हा चित्रपट सुपरडुपर फ्लॉप ठरला. यानंतर अरमान कुठल्याच चित्रपटात दिसला नाही. पण करिश्मा, करिना, रणबीर यांच्यासोबत तो अनेक पार्ट्यांना दिसतो. त्याने काहीच महिन्यांपूर्वी अनिसा या त्याच्या बालमैत्रिणीसोबत लग्न केले.