Join us

'व्हर्जिनिटी टेस्ट'सारख्या कुप्रथेवर भाष्य करणारा चित्रपट 'एक कोरी प्रेम कथा', टीझर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 4:42 PM

Ék Kori Prem Katha : 'एक कोरी प्रेम कथा' या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

व्हर्जिनिटी टेस्ट ही एक प्रदीर्घ काळापासून सुरु असलेली कुप्रथा आहे. जगातील किमान २० देशांमध्ये यासंदर्भातील प्रकरणे समोर आली आहेत. नोव्हेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने व्हर्जिनिटी टेस्ट म्हणजेच कौमार्य चाचणीवर बंदी घातली आहे. याच विषयावर आधारीत चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘एक कोरी प्रेम कथा’ (Ék Kori Prem Katha). या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

आजही भारतातील बऱ्याच ठिकाणी कौमार्य चाचणी केली जाते आणि त्यावर मुलगी लग्नासाठी योग्य का अयोग्य आहे ठरवले जाते. जर ती या चाचणीत नापास झाली तर तिला छळाचा सामना करावा लागतो. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी चिन्मय पुरोहित यांनी पेलली आहे. तर यात मुख्य भूमिकेत अभिनेत्री खनक बुद्धीराजा दिसणार आहे. ती या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. यासोबतच अक्षय ओबेरॉय, राज बब्बर, पुनम धील्लोनसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

खनक बुद्धीराजाला हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच दूसरा चित्रपट ‘जॉनी जंपर’ साईन केला आहे. खनक एक आर्किटेक्ट आहे. तसेच तिने मिस नॉर्थ इंडिया हा किताब पटकावला असून मॉडेलिंगमध्येही नशीब आजमावले आहे. या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.