Join us

अशोक सराफ यांच्यामुळे एकता कपूर झाली 'Tv queen'; जाणून घ्या ही भन्नाट स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 13:57 IST

Ekta kapoor: एकताच्या यशामध्ये मराठमोळा अभिनेता अशोक सराफ ( ashok saraf) यांचा मोलाचा वाटा आहे.

ठळक मुद्देएकताने तिच्या यशाचं सारं श्रेय अशोक सराफ यांना दिलं आहे

टेलिव्हिजन क्षेत्रातील सर्वात मोठं आणि लोकप्रिय नाव म्हणजे एकता कपूर (ekta kapoor). असंख्य लोकप्रिय मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली एकता आज प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणून ओळखली जातो. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या एकताच्या 'क्योंकी सास भी कभी बहू थी', 'कहानी घर घर की', 'कसौटी जिंदगी की', 'बडे अच्छे लगते है', यासारख्या असंख्य मालिका गाजल्या. विशेष म्हणजे सर्वसाधारण दिग्दर्शिका, निर्माती असा प्रवास करणाऱ्या एकताच्या यशामध्ये मराठमोळा अभिनेता अशोक सराफ ( ashok saraf) यांचा मोलाचा वाटा आहे. हे फार कमी जणांना ठावूक आहे. 

१९९५ साली पडोसन या मालिकेच्या माध्यमातून करिअरची सुरुवात करणाऱ्या एकताला सुरुवातीच्या काळात बऱ्याचदा अपयशाचा सामना करावा लागला. त्यामुळे तिने दिग्दर्शन सोडून द्यावं असा सल्ला तिचे वडील आणि अभिनेता जितेंद्र कपूर यांनी दिला होता. मात्र, १९९५ मध्ये तिने एक विनोदी मालिका करण्याचं ठरवलं.

Bigg Boss Marathi 3 Episodes, 1oct: मला साथ देशील का ? विकासच्या प्रश्नावर काय असेल गायत्रीचं उत्तर

एकताने १९९५ मध्ये 'हम पाच' या विनोदी मालिकेची निर्मिती केली. या मालिकेत अभिनेता अशोक सराफ मुख्य भूमिकेत झळकले होते. विशेष म्हणजे ही मालिका त्याकाळी सुपरहिट ठरली. त्यामुळे एकताने तिच्या यशाचं सारं श्रेय अशोक सराफ यांना दिलं. एका मुलाखतीत तिने तसा उल्लेखही केला होता.

दिवसेंदिवस 'फॅण्ड्री'तील शालू होतीये आणखीनच बोल्ड; पाहा Photos 

"बऱ्याचदा या मालिकेतील संवाद अत्यंत साधे होते. परंतु, आपल्या अनुभव आणि अभिनयाच्या जोरावर अशोक सराफ यांनी या संवादाचं विनोदात रुपांतर केलं. हम पांच या मालिकेला मिळालेल्या यशामुळे अनेक निर्मात्यांनी माझ्यावर विश्वास दाखवत माझ्या मालिकांमध्ये पैसे गुंतवण्यास सुरुवात केली", असं एकता म्हणाली होती.

दरम्यान, एकता कपूर आज टेलिव्हिजनची क्वीन मानली जाते. बालाजी टेलिफिल्म या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत ती मालिकांची निर्मिती करत असते. विशेष म्हणजे तिच्या मालिकांमध्ये ब्रेक मिळालेले किती तरी कलाकार आज रुपेरी पडद्यावर झळकत आहेत. मात्र, तिच्या या प्रवासात अशोक सराफ यांचा बहुमोलाचा वाटा असल्याचं पाहायला मिळतं.  

टॅग्स :अशोक सराफएकता कपूरटिव्ही कलाकार