अभिनेत्री करिना कपूर आणि सोनम कपूरच्या आगामी ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या म्युझिक लॉँचप्रसंगी निर्माती एकता कपूर माध्यमांशी बोलत होती. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांबद्दल जेव्हा एकताला विचारण्यात आले तेव्हा तिने म्हटले की, ‘पेट्रोलच्या किमती कितीही वाढू द्या; पण पुरुष महिलांना लॉँग ड्राइव्हवर घेऊन जाणारच. हा काही तो चित्रपट नाही, जो तुम्ही अशा स्थितीत बघणार नाहीत. त्यामुळे आता हीच वेळ आहे की, तुम्ही ड्रायव्हिंगवर कमी आणि थिएटरवर जास्त पैसे खर्च करायला हवेत.}}}} ">Even if petrol prices are at its highest, men will take women for drives & in today's time, women will take men for drives. This isn't the movie that you're going to stop watching as at this time you need to spend less on driving & more in theatre: Ekta Kapoor on fuel price hike pic.twitter.com/kyhaowGHVN— ANI (@ANI) May 22, 2018
एकताच्या या विचित्र वक्तव्यानंतर सोशल मीडियावर तिच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली आहे. यूजर्स तिच्या या वक्तव्याला वायफळ म्हणून संबोधत आहेत. एका यूजरने तर हेदेखील लिहिले की, एकता स्टेजवर पेट्रोल पिऊन गेली होती काय? तर काही यूजर्सनी एकताच्या या वक्तव्याचा संंबंध थेट तिच्या टीव्ही शोबरोबर जोडला. दरम्यान, आगामी ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाला एकता कपूर आणि रिया कपूर एकत्र प्रोड्यूस करीत आहेत. शशांक घोषच्या दिग्दर्शनाअंतर्गत बनलेल्या या चित्रपटाच्या कथा चार तरुणींवर आधारित आहे. चित्रपटात करिना कपूर-खान, सोनम कपूर-आहुजा, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया मुख्य भूमिकेत बघावयास मिळणार आहेत. हा चित्रपट १ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.}}}} ">लगता है मैडम को किसी ने मिरिंडा बोल के पेट्रोल पिला दिया।}}}} ">— ETHAN HUNT (@hunt_bhai) May 22, 2018