टीव्हीची क्वीन एकता कपूर आणि तिचा भाऊ तुषार कपूर यांचे नाते कसे असावे? तर प्रत्येक घरात बहीण-भावाचे असते तसे. एकता व तुषार यांची एकमेकांवर जितकी माया आहे, तितकेच तो दोघे एकमेकांशी भांडतात.एकदा तर दोघांत इतके कडाक्याचे भांडण झाले की, एकताने थेट पोलिसांना फोन केला होता. होय, ‘द कपिल शर्मा शो’मध्ये खुद्द एकताने हा खुलासा केला.एकता व तुषारने अलीकडे ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली. यावेळी एकताने अनेक इंटरेस्टिंग गोष्टी सांगितल्या. तुषारसोबतच्या नात्याबद्दलही ती बोलली.
तिने सांगितले की, ‘प्रत्येक घरात भाऊ-बहीण भांडतात. आम्हीही तसेच भांडतो. एकदा आम्ही फॅमिली ट्रिपवर तिरूपतीला गेलो होतो. यादरम्यान तुषार व माझ्यात कुठल्याशा कारणावरून वाद झाला. भांडणात तुषारने माझ्या नाकावर जोरदार पंच मारला. मला इतका राग आला की, मी थेट पोलिसांना फोन केला होता. तेव्हापासून फॅमिली ट्रिप म्हटले की, आम्ही दोघेही कधीच एका कारमध्ये जात नाही. कारण आम्ही एकत्र आलो की, आमच्यात भांडण झालेच म्हणून समजा.’