Join us

एकता कपूर पोहोचली केदारनाथच्या सेटवर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2017 10:31 AM

गेल्या महिन्यात एकता कपूरला बिझनेस टुडेकडून मोस्ट पावरफुल व्हुमनच्या टॉप बिझनेस लीडर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. डिजिटल प्लॉटफॉर्मवर ...

गेल्या महिन्यात एकता कपूरला बिझनेस टुडेकडून मोस्ट पावरफुल व्हुमनच्या टॉप बिझनेस लीडर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. डिजिटल प्लॉटफॉर्मवर एकताने मोशन पिक्चर प्रोडक्शन हाऊसची निर्मिती केली आहे. नुकतेच एकताने आपला आगामी चित्रपट केदारनाथच्या सेटवर हजेरी लावली होती. याचित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूर करतो आहे. सध्या या चित्रपटाची शूटिंग उत्तराखंडमध्ये सुरु आहे. ज्याठिकाणी आजपर्यंत कोणत्याच चित्रपटाची शूटिंग करण्यात आली नाहिये. आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून एकता कपूर आपल्या चित्रपटाच्या टीमला भेटण्यासाठी याठिकाणी आली होती. सेटवर पोहोचल्यानंतर ती अभिषेक कपूर, सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खानला भेटली. याठिकाणी येऊन तिने केदारनाथच्या मंदिरात जाऊन दर्शनही घेतले.  ALSO READ :  सैफ अली खानने लेकीला दिला हा महत्त्वाचा सल्ला.. तुम्ही पण नक्की वाचा !एकता कपूरचा बालाजी मोशन पिक्चर्स आणि क्रिअर्ज एंटरटेन्मेंट मिळून या चित्रपटाची निर्मिती करता येत. चित्रपट 'काय पो चे'च्या यशानंतर अभिषेक कपूर आणि सुशांत सिंग राजपूत यांची जोडी पुन्हा एकदा केदारनाथमध्ये एकत्र काम करणार आहे. सप्टेंबरपासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली आहे.  चित्रपटात सारा एक साधी आणि गर्ल नेट डोरच्या इमेजमध्ये दिसणार आहे. वास्तविक सारा खूपच स्टायलिश आणि ट्रेण्ड फॉलो करणारी मुलगी आहे; मात्र या चित्रपटात तिची भूमिका तिच्या पर्सनॅलिटीशी अगदीच विभिन्न प्रकारची आहे. तर सुशांत सिंग राजपूत पिठ्ठूची भूमिका साकारणार आहे. हा दोघांची लव्हस्टोरी या चित्रपटात बघायला मिळणार आहे. दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच आतुर असतील यात काही शंका नाही. सारा एका श्रीमांत घरातील मुलगी असते आणि पिठ्ठू तिच्या प्रेमात पडतो. सारा आपल्या पहिल्या चित्रपटाताला घेऊन एक्साइटेड आहे. सैफ अली खान आणि त्याची पूर्व पत्नी अमृता सिंग यांची मुलगी असल्यामुळे तिच्या डेब्यूकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सैफ आपल्या मुलांच्या चित्रपटापला घेऊन खूपच काळजीत आणि तर आई अमृता मात्र बिनधास्त असल्याची चर्चा आहे.  काही दिवसांपूर्वी सारा सेटवर नखरे दाखवत असल्याच्या बातम्यासमोर आल्या होत्या.