Ekta Kapoor, Akshay kumar : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार व इमरान हाश्मीचा ‘सेल्फी’ ( Selfiee) हा या शुक्रवारी रिलीज झाला. अक्षयने या सिनेमाचं जोरदार प्रमोशन केलं, साहजिकच त्याला या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. चाहतेही त्याचा हा सिनेमा पाहायला उत्सुक होते. पण चित्रपट रिलीज झाला आणि या सिनेमानं चाहत्यांची घोर निराशा केली. पहिल्याच दिवशी सिनेमाकडे प्रेक्षक फिरकेनासे झालेत. प्रदर्शनाच्या दिवशी या सिनेमाने फक्त २.५५ कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी ‘सेल्फी’ने ३.७५ कोटींचा बिझनेस केला. १५० कोटींचं बजेट असलेल्या सिनेमासाठी हे कलेक्शन पाहून अनेकांनी अक्षयला ट्राेल करायला सुरूवात केली. अनेकजण ‘सेल्फी’च्या अपयशाचं खापर अक्षयवर फोडत असताना निर्माती एकता कपूर हिने मात्र अक्षयचा बचाव केला आहे.
एकताने अक्षयच्या समर्थनार्थ एक इस्टा स्टोरी शेअर केली आहे. यात तिने अक्षयला पाठींबा दिला आहे. “अक्षय कुमारसारख्या विश्वसनीय अभिनेत्याबरोबर काम करायला मिळणं हे फार भाग्याचं आहे. एखाद्या व्यक्तीला मुद्दाम खाली ओढणं ही अत्यंत विकृत मानसिकता आहे. हे फारच असंवेदनशील आहे,”असं तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
‘सेल्फी’ या सिनेमावर एकूण १५० कोटींचा खर्च झाला. पण सिनेमाची बाॅक्स ऑफिसवरची सुरूवात अतिशय संथ झाली. अलीकडच्या काळात अक्षय कुमारचे बॅक टू बॅक सिनेमे फ्लॉप ठरले आहेत. गेल्यावर्षी रिलीज झालेले ‘राम सेतू’, ‘रक्षाबंधन’, ‘बच्चन पांडे’ व ‘सम्राट पृथ्वीराज’ हे त्याचे सर्व सिनेमे दणकून आपटेलत. या फ्लॉप सिनेमांची जबाबदारी अक्षयने आपल्या खांद्यावर घेतली आहे.
‘सेल्फी’ नंतर येत्या काळात अक्षयचे अनेक सिनेमे रांगेत आहेत. महेश मांजरेकरांच्या वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमात तो झळकणार आहे. ओह माय गॉड २, हेरा फेरी ३, बडे मिया छोटे मिया या चित्रपटातही तो दिसणार आहे.