YouTuber सागर ठाकूरने बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता एल्विश यादव विरुद्ध FIR नोंदवला आहे. FIR मध्ये दावा केला की, एल्विश आणि त्याच्या साथीदारांनी त्याचा मणका तोडण्याचा आणि त्याला शारीरिकदृष्ट्या जखमी करण्याचा प्रयत्न केला. एल्विश आणि त्याचे साथीदार सागर ठाकूरला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.
'मॅक्सटर्न' नावाने ओळखल्या जाणाऱ्या सागर ठाकूरने सांगितले की, एल्विश यादवने त्याच्या चेहऱ्यावर ठोसा मारला आणि मोबाईल फोनने त्याच्या मणक्यालाही मारले. त्याने असाही दावा केला की बिग बॉस OTT 2 च्या विजेत्याने त्याला जीवे मारण्याच्या अनेक धमक्या दिल्या. YouTuber ने पुढे असा आरोप केला की "माझ्या हत्येचा प्रयत्न केल्याचा स्पष्ट पुरावा असून भारतीय दंड संहिता (IPC) च्या जामीनपात्र कलमांखाली FIR दाखल करण्यात आला आहे. "
सागरने आरोप केला की एल्विश यादवचे फॅन पेजेस काही महिन्यांपासून द्वेष आणि अपप्रचार पसरवत आहेत. ज्यामुळे त्याला त्रास होत होता. "8 मार्च 2024 रोजी सकाळी 12.30 वाजता सर्व 8-10 लोक आले. एल्विश यादवने जाण्यापूर्वी मला जीवे मारण्याची धमकी दिली आणि मी जवळजवळ बेशुद्ध पडलो. मी या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती करतो आणि आयपीसीच्या कलम 308 आणि 307 च्या दोषी मनुष्यवधाच्या कायद्यानुसार (घ्या) कारवाई करा. माझी वैद्यकीय तपासणी पोलिसांमार्फत व्हावी, असे सागर ठाकूरच्या FIR मध्ये म्हटले आहे.