Join us  

Kangana Ranaut : नेमकं कुठं अडलंय? लग्नाबद्दल विचारताच कंगना राणौत म्हणाली - मला लग्न अन् कुटुंब..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 1:22 PM

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत कायमच चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं.

Kangana Ranaut Marriage Plan: बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत (Kangana Ranaut) कायमच चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. कंगना कधी तिच्या वक्तव्यांमुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.  बॉलिवूडनंंतर कंगनाने राजकारणात एन्ट्री घेतली आणि पहिल्याच प्रयत्नात ती खासदार बनली. कंगनाने मंडी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली आणि ती निवडून आली. बॉलिवूड, राजकारणात यश मिळवल्यानंतर आता कंगना लग्न कधी करणार आहे, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडतोय. नुकतंच एका मुलाखतीमध्ये कंगनाने लग्नाबद्दल (Kangana Ranaut on Marriage) खुलासा केला. 

कंगनाने नुकतंच राज शमानीच्या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी बोलताना अभिनेत्रीनं लग्न करण्याची इच्छा असून स्वतःचे कुटुंब हवे असल्याचे सांगितले.  'लग्न करून कुटुंब सुरू करायचं आहे का?' या प्रश्नावर उत्तर देताना कंगना म्हणाली, "हो नक्कीच. मला वाटतं प्रत्येकाचा जोडीदार असावा. जोडीदारासोबतही अडचणी येतात, पण जोडीदार नसेल तर आणखी अडचणी येतात. त्यासाठी तुम्हाला योग्य व्यक्ती शोधावी लागेल, ही एक वेगळी गोष्ट".

कंगना पुढे म्हणाली, "तुम्ही जसजसे मोठे होता, तसेतसे तुमच्यासाठी एकमेकांशी जुळवून घेणे अधिक कठीण होत जाते. जर तुम्ही लहान वयात लग्न केले तर ते जुळवून घेणे खूप सोपे जाते. खेड्यापाड्यातील लोकांची लग्ने अगदी लहान वयात होत असतात". कंगनाच्या या विधानंतर तिला लग्नाचे वेध लागल्याचे बोलले जात आहे.  काही दिवासांपुर्वी कंगनाने डेटिंग करत असल्याचं कबुल केलं होतं. पण, ती नेमकं कुणाला डेट करतेय याचा खुलासा तिनं केला नव्हता.

सध्या कंगना एकाच वेळी दोन जबाबदाऱ्या पार पाडत आहे. एकीकडे मंडीमधील जनतेचे प्रश्न ती संसदेत मांडतेय. दुसरीकडे नुकतंच कंगनाचा 'इमर्जन्सी' (Emergency) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून ती सिनेमाचं प्रमोशनदेखील करत आहे. 'इमर्जन्सी' हा चित्रपट ती 6 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. यामध्ये कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (former PM Indira Gandhi) यांच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगनाने या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. 

टॅग्स :कंगना राणौतबॉलिवूडसेलिब्रिटीलग्नहिमाचल प्रदेशइंदिरा गांधी