कंगना राणौतच्या आगामी 'इमर्जन्सी' सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. इंदिरा गांधी आणि त्यांनी लावलेली आणीबाणी यावर हा सिनेमा आधारीत आहे. या सिनेमाच्या रिलीजला अवघे काहीच दिवस बाकी आहेत. पण सिनेमासंबंधी मोठा वाद निर्माण झालाय. कंगनाला सर्वच स्तरांमधून टीकेला सामोरं जावं लागतंय. अशातच सिनेमाचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता दिसतेय. कारण 'इमर्जन्सी' सिनेमाचं सेन्सॉर सर्टिफिकेट थांबवण्यात आलंंय. यावर कंगनाने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.
सेन्सॉर सर्टिफिकेट थांबवलं, कंगना काय म्हणाली?
कंगनाच्या सिनेमाचं सेन्सॉर सर्टिफिकेट थांबवण्यात आल्याची गोष्ट उघडकीस आलीय. याविषयी कंगनाने व्हिडीओत सांगितलंय की,"आमचा सिनेमा सेन्सॉरमधून पास झाला होता. परंतु सेन्सॉर सर्टिफिकेट अडवण्यात आलं. आमच्या सिनेमामुळे सेन्सॉर बोर्डालाही धमकी मिळाली आहे. इंदिरा गांधीचा मृत्यू दाखवू नये, असा आमच्यावर दबाव आहे. पंजाबमध्ये झालेली दंगल, जरनैल सिंह भिंडरावाले प्रसंग दाखवू नये असं सांगण्यात येतंय. मग मी सिनेमात दाखवू तरी काय? सध्या जे घडतंय त्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. एका देशातील राज्यात असं होतंय."
इमर्जन्सी सिनेमाविषयी
अशाप्रकारे कंगनाने राग व्यक्त केलाय. 'इमर्जन्सी' हा चित्रपट ६ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. जो भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित आहे. ज्यांची त्यांच्या अंगरक्षकांनी हत्या केली होती. या चित्रपटात कंगना राणौत ही इंदिरा गांधींच्या भूमिकेत आहे. मात्र, कंगनाचा सिनेमा वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नव्हे, याआधीही तिने अनेकदा अशा कॉन्ट्रोव्हर्सींचा सामना केला आहे.