बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीबद्दल (Emraan Hashmi ) सोमवारी एक धक्कादायक बातमी समोर आली. होय, ‘ग्राऊंड झिरो’ या चित्रपटाच्या शूटींगसाठी काश्मिरातील पहलगाम येथे गेला असता त्याच्यावर दगडफेक करण्यात आली. इमरान शूटींग संपवून मार्केटमध्ये फिरत असताना काही अज्ञातांनी त्याच्यावर दगडफेक करायला सुरूवात केली. या घटनेत इमरान जखमी झाल्याचं वृत्त आलं होतं. आता खुद्द इमरानने याबद्दल खुलासा केला आहे.या संपूर्ण घटनेच्या पार्श्वभूमीवर त्याने एक ट्विट केलं आहे.
इमरानचं ट्विट
‘काश्मीरचे लोक फारच जोरदार स्वागत करतात, ते आदरातिथ्य करणारे आहेत. श्रीनगर व पहलगाम येथे शूटींग करून मज्जा आली. दगडफेकीच्या घटनेत मी जखमी झाल्याचं वृत्त चुकीचं आहे,’असं ट्विट इमरानने केलं. त्याच्या या ट्विटने त्याच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला. इमरानला इजा झाली नाही, तो एकदम ठीक आहे, हे ऐकून त्याचे फॅन्स खूश्श झालेत.
इमरानने काश्मिरी फॅन्सला केलं नाराज?इमरानने पहलगाम आधी श्रीनगरमध्ये शूटींग केलं होतं. तो 14 दिवस श्रीनगरमध्ये होता. रिपोर्टनुसार, शूटींग संपल्यानंतर इमरान आपल्याला भेटेल, अशी श्रीनगरच्या चाहत्यांची अपेक्षा होती. अनेक तास चाहते त्याची प्रतीक्षा करत होते. पण इमरानने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. यामुळे काश्मिरी फॅन्स नाराज होते. कित्येक तासांपासून अनेकजण इमरानसोबत सेल्फी घेण्यासाठी, त्याला भेटण्यासाठी वाट बघत होते. पण इमराने त्यांच्याकडे बघितलं सुद्धा नाही. यामुळे चाहते नाराज झालेत.
कालच्या शूटिंगनंतर इमरान आणि काही क्रू मेम्बर्स संध्याकाळी 7.15 च्या सुमारास पहलगामच्या बाजारात गेले होते. त्यावेळी काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर दगडफेक केली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात त्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमरानचा ‘ग्राउंड झिरो’ हा चित्रपट एक मिलिटरी ड्रामा आहे. या चित्रपटात इम्रान हाश्मी एका लष्कर अधिकाºयाच्या भूमिकेत दिसणार आहे. मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर या चित्रपटात इमरान हाश्मीच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसणार आहे.