इमरान हाश्मी (Emraan Hashmi) आणि मल्लिका शेरावत (Mallika Sherawat) यांचा मर्डर हा सिनेमा बॉलिवूडमध्ये बराच गाजला होता. या सिनेमात इमरान आणि मल्लिका या जोडीने बरेच बोल्ड आणि इंटिमेट सीन दिले होते. या सिनेमासोबतच त्यातील गाणी आणि ही जोडी सुपरहिट ठरली होती. मात्र, या सिनेमाच्या सेटवरच इमरान आणि मल्लिकामध्ये मतभेद निर्माण झाले होते. ज्यामुळे जवळपा २० वर्ष ही जोडी एकमेकांचं तोंडही पाहात नव्हती. मात्र, तब्बल २० वर्षानंतर आता त्यांच्यातील मतभेद दूर झाले आहेत.
अलिकडेच निर्माते आनंद पंडित यांच्या मुलीच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी होती. या पार्टीमध्ये कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. मात्र, या सगळ्यात नेटकऱ्यांच्या नजरा वेधल्या त्या मर्डर कपलने अर्थात मल्लिका शेरावत आणि इमरान हाश्मी या जोडीने. कारण, तब्बल २० वर्षांचा अबोला दूर करुन ही जोडी पहिल्यांदाच एकत्र आली.
विरल भय्यानी यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये मल्लिका आणि इमरान या दोघांनी रिसेप्शन पार्टीमध्ये एकत्र एन्ट्री घेतली. इतकंच नाही तर त्यांनी फोटोसाठी पोझही दिली. त्यामुळे त्यांची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा होतीये.
दरम्यान, २००४ मध्ये मर्डरच्या सेटवर मल्लिका-इमरान यांचं जोरदार भांडण झालं होतं. त्यानंतर या जोडीने एकमेकांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. इतकंच नाही तर या सिनेमानंतर त्या दोघांनी एकत्र काम ही केलं नाही.