Join us

'तिच्यासोबत पुन्हा काम...', इम्रान हाश्मीने मल्लिका शेरावतसोबतच्या वादावर केलं भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 09:57 IST

'मर्डर' सिनेमावेळीच त्यांच्यात भांडण झालं होतं आणि नंतर दोघांनी एकमेकांचा चेहराही पाहिला नाही. काही दिवसांपूर्वी २० वर्षांनी दोघं एकमेकांसमोर आले होते.

2004 साली आलेल्या 'मर्डर' सिनेमातून इम्रान हाश्मी (Emraan Hashmi) आणि मल्लिका शेरावत (Mallika Sherawat) या हॉट जोडीने लक्ष वेधून घेतलं होतं. सिनेमातील गाणी, दोघांच्या केमिस्ट्रीने तर आग लावली होती. मात्र नंतर दोघांनी एकत्र कामच केलं नाही. सिनेमावेळीच त्यांच्यात भांडण झालं आणि नंतर त्यांनी एकमेकांचा चेहराही पाहिला नाही. काही दिवसांपूर्वीच एका इव्हेंटमध्ये २० वर्षांनी दोघं एकमेकांसमोर आले होते. तेव्हा त्यांच्या एकत्रित फोटोंनी पुन्हा इंटरनेटवर आग लावली. चाहते वेडेच झाले. नुकतंच इम्रान हाश्मीने मल्लिकासोबत पुन्हा काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

काय म्हणाला इम्रान हाश्मी?

'न्यूज 18'ला दिलेल्या मुलाखतीत इम्रान हाश्मी म्हणाला, "तेव्हा आम्ही तरुण आणि मूर्ख होतो. तुम्ही आयुष्यात अशा स्टेजवर असता जेव्हा तुमची निर्णय घेण्याची क्षमता मर्यादित होते आणि तुम्हाला लवकर राग येतो. काही गोष्टी ती मला बोलली आणि काही मी तिला. पण आता सगळं जुनं झालं ते विसरायला हवं. तिला इतक्या वर्षांनी भेटून छान वाटलं, ती माझी कोस्टार आहे. तिच्यासोबत पुन्हा काम करायला हवं होतं."

इम्रान हाश्मी 'शोटाईम' या वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे. ही सीरिज १२ जुलै रोजी हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. याआधी तो 'टायगर 3' मध्ये दिसला होता. तर मल्लिकाही पुन्हा स्क्रीनवर कमबॅक करण्याच्या तयारित आहे. इम्रान हाश्मी आणि मल्लिका शेरावत पुन्हा पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

टॅग्स :इमरान हाश्मीमल्लिका शेरावतसिनेमाबॉलिवूड