Join us

ईशाच्या घटस्फोटावर देओल कुटुंबाचं मौन का? समोर आलं खरं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 16:30 IST

ईशाच्या घटस्फोटावर हेमा मालिनींचा असा आहे स्टँड

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मोठी मुलगी ईशा देओलचा (Esha Deol) घटस्फोट झाला आहे. पती भरत तख्तानीसोबतचा तिचा १२ वर्षांचा संसार मोडला आहे. दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर भरत तख्तानी आणि ईशामध्ये दुरावा निर्माण झाला होता. ईशाचं पतीकडे खूपच दुर्लक्ष होत होतं. अखेर घटस्फोटापर्यंत गोष्टी आल्या आणि दोघंही वेगळे झाले. ईशाच्या घटस्फोटावर देओल कुटुंबातील एकानेही प्रतिक्रिया दिलेली नाही. यामागचं खरं कारण आता समोर आलं आहे. 

हेमा मालिनी सध्या आपल्या मुलीला पूर्ण पाठिंबा देत आहेत. तसंच दोन नातींचाही सांभाळ करत आहेत. झूम रिपोर्टनुसार, गेल्या काही वर्षांपासूनच ईशा आणि भरत यांच्यात गोष्टी बिनसल्या होत्या. दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय खूप आधीच घेतला होता. फक्त ते योग्य वेळेच्या प्रतिक्षेत होते. आता सगळंच समोर आलं असून दोघंही आपापल्या आयुष्यात पुढे जात आहेत. तर दुसरीकडे हेमा मालिनी आताच लेकीच्या घटस्फोटावर प्रतिक्रिया देऊ इच्छित नाहीत. हा लेकीने घेतलेला निर्णय आहे यामध्ये हेमा मालिनी ढवळाढवळ करणार नाहीत असं समोर आलं आहे. मात्र त्या प्रत्येक पावलावर ईशासोबत उभ्या आहेत. 

गेल्या वर्षी हेमा मालिनी यांचा 75 वा वाढदिवस थाटामाटात साजरा झाला होता. मात्र या वाढदिवसाच्या पार्टीत ईशा एकटीच होती. तिच्यासोबत पती भरत तख्तानी दिसला नव्हता. तेव्हाच त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. तसंच भरत तख्तानी बँगलोरमध्ये एका मुलीसोबत दिसल्याचीही माहिती पसरली होती. त्यामुळे भरतचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याचं बोललं गेलं होतं. मात्र ईशाने आधीच तिच्या पुस्तकातून त्यांच्या नात्याचा खुलासा केला होता. 

टॅग्स :इशा देओलहेमा मालिनीधमेंद्रघटस्फोटबॉलिवूड