Join us

'मला काहीच माहित नव्हतं...' वडिलांच्या किसींग सीनवर ईशा देओलची प्रतिक्रिया चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 09:50 IST

माझ्यासाठी तर हे खूपच....ईशा देओलला वडिलांच्या किसींग सीनबद्दल काय वाटलं?

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) आणि अभिनेत्री शबाना आजमी (Shabana Azmi) यांच्या किसींग सीनची चर्चा अजूनही सुरुच आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमात धर्मेंद्र आणि शबाना यांची क्युट लव्हस्टोरी दाखवली आहे. तसंच त्यांचा एक छोटा किसींग सीनही आहे. या सीनवर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लेक ईशा देओलचीही यावर प्रतिक्रिया समोर आली आहे.

सध्या 'गदर 2'मुळे सनी देओल चर्चेत आहे. नुकतंच त्याच्या मुलाचं लग्न झालं. यामध्ये देओल कुटुंबाचा एकत्र फोटो समोर आला. तर 'रॉकी और रानी' मुळे धर्मेंद्र प्रसिद्धीझोतात आले आहेत. 'गदर 2'च्या यशात सनी देओलची सावत्र बहीण ईशाही सहभागी झाली. यामुळे अख्खं देओल कुटुंबच आता चर्चेत आलं आहे. नुकतंच ईशा देओलने एका टॉक शोला मुलाखत दिली. यावेळी तिला धर्मेंद्र आणि शबाना यांच्या किसींग सीनबाबत विचारण्यात आलं. यावर ती म्हणाली, 'मला याबद्दल काहीच माहीत नव्हतं. हे आमच्यासाठी एक सरप्राईजच होतं. दोघंही खूप गोड दिसत आहेत आणि ते प्रोफेशनल आहेत. '

सावत्र भावंडांना एकत्र बघून हेमा मालिनी म्हणाल्या, "यात काही नवीन नाही कारण..."

यापूर्वी हेमा मालिनी यांनीही धर्मेंद्र यांच्या किसींग सीनवर प्रतिक्रिया दिली होती. ' मी सिनेमा अजून पाहिला नाही. पण लोक त्यांना इतकं प्रेम देत आहेत हे पाहून मी त्यांच्यासाठी खूप खूश आहे. त्यांना कॅमेऱ्यासमोर राहायला नेहमीच आवडतं.' याशिवाय हेमा मालिनी यांनी आपणही किसींग सीन द्यायला तयार असल्याचं एका मुलाखतीत सांगितलं.

टॅग्स :इशा देओलधमेंद्रशबाना आझमीबॉलिवूड