Join us

कटप्पासोबत बोल्ड सीन देणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीच्या मूर्तीची तब्बल तीन मंदिरांत केली स्थापना!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2017 3:56 PM

साउथ कलाकारांविषयी त्यांच्या चाहत्यांमध्ये प्रचंड आस्था आहे. या कलाकारांना त्यांचे चाहते देवाचा दर्जा देतात, असाच दर्जा या अभिनेत्रीला दिला आहे. वाचा सविस्तर!

लग्नाच्या बातम्यांवरून चर्चेत आलेली साउथ सुपरस्टार नमिताने तिच्या लग्नाची आॅफिशियली घोषणा केली आहे. नमिताने एका स्टेटमेंटमध्ये म्हटले की, ती २४ नोव्हेंबर रोजी बॉयफ्रेंड वीरा (विरेंद्र चौधरी) याच्याशी लग्न करणार आहे. हा लग्नसोहळा तिरुपती येथे पार पडणार आहे. नमिताने म्हटले की, वीरा माझा खूप चांगला मित्र असून, तो माझ्यावर खूप प्रेम करतो. आमचे हे लव्ह कम अरेंज मॅरेज असेल. असो, तुम्हाला माहिती आहे काय की साउथमध्ये नमिताची लोकप्रियता प्रचंड आहे? होय, नमिताच्या चाहत्यांनी चक्क तीन मंदिरांमध्ये तिच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. खरं तर साउथमधील अभिनेते-अभिनेत्रींना त्यांचे चाहते देवापेक्षा कमी समजत नाहीत. त्यांना देवाचा दर्जा देताना त्यांची पूजा-अर्चाही करतात. परंतु साउथच्या एखाद्या मंदिरात गुजराती अभिनेत्रीची मूर्ती बसवून त्याची पूजा करणे हे बहुधा नमिताच्या बाबतच घडले असावे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुरतची रहिवासी असलेली नमिता वांकावाला ऊर्फ भैरवीची पहिली मूर्ती तामिळनाडूच्या तिरुनलवेली स्थित एक मंदिरात बसविण्यात आली. आता साउथमध्ये तिचे एक नव्हे तर तीन-तीन मंदिरे आहेत.  दरम्यान, नमिताने १९९८ मध्ये ‘मिस सुरत’चा किताब तिच्या नावे केला आहे. त्यानंतर २००१ मध्ये ती मिस इंडिया स्पर्धेतही रनरअप राहिली आहे. त्यावेळी हा किताब अभिनेत्री सेलिना जेटली हिने तिच्या नावे केला होता. जवळपास सहा फूट उंची असलेली नमिता केवळ साउथचीच नव्हे तर बॉलिवूडमधीलही सर्र्वांत उंच अभिनेत्रींपैकी एक आहे. त्याचबरोबर नमिताने कराटेमध्ये डबल ब्लॅक बेल्ट मिळविला आहे. त्याचबरोबर नमिताने ‘बाहुबली’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात ‘कटप्पा’ची भूमिका साकारणाºया अभिनेता सत्यराज याच्यासोबत रोमान्स केला आहे. ३५ वर्षीय नमिताने एका चित्रपटात ६३ वर्षीय सत्यराज याच्याशी अतिशय बोल्ड सीन दिले आहेत. तिचा हा चित्रपट त्याकाळी चांगलाच चर्चेत आला होता.