Join us

बॉलिवूडमध्ये स्टार बनल्यानंतरही नाइट क्लबमध्ये काम करायचा बॉबी देओल,जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 5:43 PM

'बरसात' या सिनेमातून बॉबीने आपल्या अभिनय कारकीर्दला सुरुवात केली होती. हा सिनेमा सुपरहिट ठरला आणि बॉबी देओल रातोरात स्टार बनला. मात्र हे स्टारपण प्रत्येकाला जपता येत नाही.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता बॉबी देओल  हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. बॉबी देओल हा सध्या त्याच्या आश्रम या सीरिजमुळे चर्चेत आहे.या सीरिजच्या दोन्ही सिझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली. हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवून बॉबीला २७ वर्षे पूर्ण झाली आहेत. या २७ वर्षात बॉबीने विविध सिनेमांमधून वैविध्यपूर्ण आणि एकाहून एक सरस भूमिका साकारल्या.

'बरसात' या सिनेमातून बॉबीने आपल्या अभिनय कारकीर्दला सुरुवात केली होती. हा सिनेमा सुपरहिट ठरला आणि बॉबी देओल रातोरात स्टार बनला. मात्र हे स्टारपण प्रत्येकाला जपता येत नाही. हीच बाब बॉबी देओल बाबतीतही घडली. त्यांने अनेक सिनेमा केले. मात्र रसिकांनी या सिनेमांना नाकारलं. पण त्यानंतर त्याचे मोजकेच सिनेमे हिट ठरले. त्याचे बहुतेक सिनेमे हे नंतर फ्लॉप ठरले. इतकंच काय तर लोकप्रियताही कमी होत गेली आणि त्यामुळेच सिनेमात काम मिळणं कठीण झालं होतं. बॉबीच्या आयुष्यात असाही एक क्षण आला जेव्हा त्याला दिल्लीतील एका नाईट क्लबमध्ये डीजे म्हणूनही काम करावे लागले होते. 

दुसऱ्यांदा बॉबीने अभिनय क्षेत्रात आपले नशीब आजमवले त्यावेळी बॉबी देओलने 'रेस 3' सिनेमामध्ये सलमान खानसोबत काम केले होते. या सिनेमातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्याचे काम पाहून  आश्रम वेब सिरीजची ऑफर त्याला मिळाली.या वेब सीरिजच्या यशाने इंडस्ट्रीत बॉबीने त्याचे गमावलेले स्थान परत मिळवले. रुळावरुन घसरलेली  करिअरची गाडी आज सुस्साट सुरु आहे.बॉबीचे नशीब चित्रपटांमध्ये चालले नसेल, पण संपत्तीच्या बाबतीत तो अनेक स्टार्सच्या पुढे आहे.

बॉबी देओलची गणना सर्वात श्रीमंत अभिनेत्यांमध्ये केली जाते. बॉबी देओल हा एका सिनेमासाठी दोन ते चार कोटींचे मानधन घेतो. मुंबईत सुहाना आणि सिंपल्स एल्स नावाची दोन चायनीज रेस्टॉरंट्स आहेत, ज्यातून तो भरपूर कमाई करतो. याशिवाय बॉबीची पत्नी तान्या हिचाही द गुड अर्थ नावाचा होम डेकोरेशनचा बिझनेस आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याची एकूण संपत्ती 50 कोटींच्या आसपास आहे.

टॅग्स :बॉबी देओलआश्रम चॅप्टर २