प्रत्येक भूमिका आव्हानात्मक! -आमिर खान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 06:14 PM2018-11-06T18:14:43+5:302018-11-06T18:15:44+5:30
अभिनेता आमिर खानला बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटले जाते. तो त्याच्या चित्रपट निवडीबाबत खूपच चोखंदळ असतो. आता तो एका बहुचर्चित चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
जितेंद्र कुमार
अभिनेता आमिर खानला बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटले जाते. तो त्याच्या चित्रपट निवडीबाबत खूपच चोखंदळ असतो. आता तो एका बहुचर्चित चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे देखील दिसतील. याबाबतीत आमिर खानसोबत मारलेल्या या गप्पा...
* ‘ठग्स’ च्या बाबतीत अनेक चर्चा आहेत, काय सांगशील?
- या चित्रपटात माझी भूमिका अशी आहे की, तुम्हाला त्याचा खूप राग येईल. प्रत्येक व्यक्तीला तो स्वत:ची वेगळीच अशी ओळख सांगत असतो. कुणालाही त्याची खरी ओळख मिळू देत नाही. कितीही वाईट असले तरीही माझ्यासाठी ही भूमिका म्हणजे एक आव्हान होते, जे मी आता पूर्ण केले आहे.
* कोणत्या एखाद्या व्यक्तीकडे बघून तू आश्चर्यचकित झाला आहेस का?
- होय. मी अमिताभ बच्चन यांच्याकडे बघून आश्चर्यचकित झालो होतो. त्यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचा आवाज यांच्यामुळे मी भारावून गेलो होतो. एकदा माल्टा येथे आम्ही शूटिंग करत होतो तर मी त्यांच्या रूममध्ये गेलो तेव्हा मी त्यांना चित्रपट बघण्यासाठी बोलावत होतो. तेव्हा ते म्हणाले की,‘आता हा काही चित्रपट बघण्याचा वेळ आहे का?’ त्यांचा सेक्युरिटी गार्डही नव्हता. माझ्या सारखे बोलण्याने ते कसेतरी तयार झाले. चित्रपट बघत असताना ते अनेकदा परेशानही झाले आणि घाबरलेही.
* एखाद्या हिरोईनवर क्रश झाला होता का?
- होय, श्रीदेवींवर नेहमी क्रश होता. मला त्यांच्यासोबत काम करायचं होतं. मी कायम काहीतरी बहाणा करायचो त्यांच्यासोबत काम मिळण्यासाठी. एकदा मी त्यांच्यासोबत एक जाहीरात केली होती. मी त्यांच्या डोळयात कधीही बघत नसे, कारण मला माहित होतं की, मी त्यांच्या केवळ डोळयातच बघत राहीन. एकदा मी महेश भट्ट यांना श्रीदेवीसोबत चित्रपट करण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु, ते होऊ शकले नाही आणि ती कहानी पूजा भट्ट यांच्यासोबतच करावी लागली.
* दिवाळीबद्दल काय आठवणी आहेत?
- मी जेव्हा लहान होतो तेव्हा फुलझडी आणि चक्री उडवत होतो. परंतु आता मला फटाक्यांमुळे खूप भीती वाटते. मला वाटतं की, ही फटाके खरेदी म्हणजे पैशांचा अपव्यय आहे. प्रदुषणमुक्त दिवाळीचा पुरस्कर्ता आहे.