Join us

७० हजारांचे कपडे झालेत खराब! किम शर्माने मोलकरणीला केली मारहाण!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 11:44 IST

अभिनेत्री किम शर्मा दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून दूर आहे. पण सध्या किम शर्मा एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे.

अभिनेत्री किम शर्मा दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून दूर आहे. पण सध्या किम शर्मा एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. होय, अभिनेत्रीच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीने किमवर मारहाण केल्याचा व वेतन थकवल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात किमविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्थात किमने या सगळ्या आरोपांचे खंडन केले आहे.

मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, किमच्या घरी काम करणा-या ३१ वर्षीय एस्थर खेसने किमवर मारहाण केल्याचा आरोप केला आहे. एस्थर खेस ही किमच्या घरी २७ एप्रिलपासून काम करत होती. यादरम्यान गत २१ मे रोजी ती कपडे धूत असताना लाईट आणि डार्क कलरचे कपडे वेगवेगळे करायला विसरली. याचवरून किमने  मारहाण केली आणि यानंतर घरातून हाकलून लावले, असा आरोप एस्थरने केला आहे. किमने अद्यापही वेतन न दिल्याचा आरोपही तिने ठेवला. तिने सांगितले की, कपडे धुतल्याानंतर ब्लॅक ब्लाऊजचा रंग पांढ-या टीशर्टला लागलेला मला दिसला. माझ्याहातून चुकून हे घडले होते. मी किम यांना हे सांगायला गेले़ पण त्या कपडे खराब झालेले बघून प्रचंड संतापल्या. रागाच्या भरात त्या मला नाही नाही ते बोलल्या, मला अश्लील शिव्या दिल्यात. माझ्यावर हातही उचलला. यानंतर मी माझ्या कामाचे पैसे मागायला गेले. पण मला हाकलून लावले गेले. यानंतर २७ जूनला मी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.दरम्यान किमने हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. मी दर महिन्याच्या ७ तारखेला मेडला तिच्या कामाचे पैसे देते. मी एस्थरला अजिबात मारहाण केलेली नाही. तिने माझे ७० हजारांचे कपडे खराब केलेत, असे ती म्हणाली. आता हे प्रकरण पुढे काय वळण घेते, ते बघूच.

 

टॅग्स :बॉलिवूड