Join us

आदिल खानने राखी सावंतच्या आजाराला म्हटलं 'ढोंग'; कॅन्सर, हार्ट प्रॉब्लेमची केली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 12:12 PM

Rakhi Sawant And Adil Khan : राखी सावंतचा एक्स बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानी याने राखी सावंतच्या आजाराला 'ढोंग' म्हटलं आहे. त्याने तिच्या कॅन्सर आणि हार्ट प्रॉब्लेमची पोलखोल केली आहे. 

ड्रामा क्वीन राखी सावंतला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इंटरनेटवर तिचे रुग्णालयातील फोटो व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. राखीला नेमकं काय झालंय? असा प्रश्न अनेकांना पडला. तिचा पहिला पती रितेश आणि भाऊ राकेश सावंत यांनी तिला रुग्णालयात दाखल केल्याचं म्हटलं आहे. आता राखीचा एक्स बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानी याने राखी सावंतच्या आजाराला 'ढोंग' म्हटलं आहे. त्याने तिच्या कॅन्सर आणि हार्ट प्रॉब्लेमची पोलखोल केली आहे. 

अभिनेत्री आणि 'बिग बॉस'ची एक्स कंटेस्टेंट राखी सावंतला छातीत तीव्र वेदना होत असल्याच्या तक्रारीनंतर मंगळवारी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बुधवारी तिचा पहिला पती रितेश कुमार आणि तिच्या भावाने हेल्थ अपडेट दिले होते. याच दरम्यान, सरेंडरची तारीख जवळ येत असल्याने राखी हे नाटक करत असल्याचा दावा आदिल खान दुर्रानीने केला आहे.

न्यूज18 शी बोलताना आदिल खान दुर्रानी म्हणाला की, "कोणताही मेडिकल रिपोर्ट नाही. डॉक्टर काहीच बोलले नाहीत. ती कोणत्या रुग्णालयात आहे हे आम्हाला माहीत नाही. जर हृदयविकाराचा झटका आला असेल तर मला वाटतं की रुग्णांना ऑक्सिजन मास्कची आवश्यकता असते, परंतु राखी सावंतकडे तेही नाही. तिला लवकरच पोलिसांसमोर सरेंडर करावं लागणार असल्यानेच ती हे करत आहे. जेलमध्ये जाण्यापासून वाचण्यासाठी ती हे नाटक करत आहे."

आदिलने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो म्हणत आहे की, मी एक बातमी पाहिली ज्यामध्ये राखीला हृदयविकार आहे आणि तिच्या पहिल्या पतीने सांगितलं की, डॉक्टर सांगत आहेत की, कॅन्सर होण्याची शक्यता आहे. वर्षभरापूर्वी जेव्हा मी तिच्या सर्व चाचण्या केल्या होत्या आणि तिच्यावर शस्त्रक्रियाही केली होती, तेव्हा तिची तब्येत पूर्णपणे चांगली होती. अशी कोणतीही समस्या नव्हती.

आदिल पुढे म्हणाला की, कोर्टाची तारीख जवळ येत आहे. जर ती पब्लिसिटी स्टंट करत असेल तर… कोर्ट, जनता, प्रत्येक व्यक्ती तुला पाहत आहे. यापेक्षा घृणास्पद काहीही असू शकत नाही. जर तू खरोखरच आजारी असशील तर तू लवकर बरी व्हावीस अशी मी मनापासून प्रार्थना करतो. मी एक चांगला माणूस आहे आणि मी कोणाचेही नुकसान करू इच्छित नाही. 

टॅग्स :राखी सावंतहॉस्पिटल