Join us

Aamir Khan birthday : एक्स-वाईफ किरण रावने आमिर खानला दिलं वाढदिवसाचं सुपर स्पेशल गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 1:29 PM

Aamir Khan birthday : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा आज वाढदिवस. आज आमिर त्याचा 57 वा वाढदिवस साजरा करतोय. यंदाचा आमिरचा वाढदिवस भलताच खास आहे.

 Aamir Khan birthday : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) याचा आज वाढदिवस. आज आमिर त्याचा   57 वा वाढदिवस साजरा करतोय. यंदाचा आमिरचा वाढदिवस भलताच खास आहे. कारण काय तर, वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच आमिर स्वत:च्या खासगी आयुष्याबद्दल इतकं भरभरून बोलला आहे. एका ताज्या मुलाखतीत त्याने स्वत:च्या पर्सनल लाईफबद्दलचे अनेक खुलासे केलेत. अगदी या वाढदिवसाला किरण रावने (Kiran Rao) त्याला काय गिफ्ट दिलं, हेही त्याने सांगितलं. 

आमिर व किरण राव यांनी गतवर्षी एकमेकांपासून घटस्फोट घेत असल्याचं जाहिर केलं होतं. पण अद्यापही दोघं चांगले मित्र आहेत. आज आमिरच्या वाढदिवशी किरणने त्याला न चुकता स्पेशल गिफ्ट दिलं आणि आमिरने सगळ्यांसमोर हे स्पेशल गिफ्ट काय, ते सांगितलं.

काय आहे स्पेशल गिफ्ट...किरणने मला माझ्या वाढदिवसाला खास भेट दिली आहे. तिने मला 10-12 पॉइंटची एक लिस्ट दिली आहे.  माझ्यात काय त्रूटी आहेत?, व्यक्ति म्हणून माझ्यात काय सुधारणा आवश्यक आहेत? हे तिने सांगितलंय. अगदी प्रामाणिकपणे मला माझ्या वीकनेसबद्दल सांगितलं आहे आणि तेच गिफ्ट माझ्यासाठी बेस्ट आहे. तिने जे सांगितलं ते आजपर्यंत मला कधी कुणीच सांगितलं नव्हतं, असं आमिर मीडियाशी बोलताना म्हणाला.गेल्या वर्षी जुलै महिन्यात आमिरने दुसरी पत्नी किरण रावला घटस्फोट देत असल्याची घोषणा केली होती. यानंतर  आमिर लवकरच फातिमासोबत लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. ‘लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर आमिर त्याच्या तिसºया लग्नाची घोषणा करणार, अशीही चर्चा होती. पण या सगळ्या अफवा असल्याचं आमिरने स्पष्ट केलं आहे.

आमिरने 1987 मध्ये रिना दत्ताशी लग्न केलं होतं.  2002 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर 2005 साली आमिरने किरण रावशी दुसरं लग्न केलं होतं. दोघांना आझाद नावाचा एक मुलगा आहे.  

टॅग्स :आमिर खानकिरण रावबॉलिवूड